- उपचार सुरु असणारे बाधित 2416
- बाधितांची एकूण संख्या 5568
- चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 3086 बाधितांना डिस्चार्ज
- आज पर्यंत 60 बाधितांचा मृत्यू
चंद्रपूर -
आज जिल्ह्यात 315 बाधितांची नोंद झाली असून आता कोरोना बाधितांची एकूण संख्या 5568 झाली आहे. कोरोना पादुर्भाव रोखण्याकरिता चंद्रपूर, बल्लारपूर शहरात जनता कर्फ्यूचा आज तीसरा दिवस असून जनता कर्फ्यू असतांना देखील मोठ्या प्रमाणात बाधित आढळून येत आहेत.
जिल्ह्यात आत्तापर्यंत 3086 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे.
सध्या जिल्ह्यामध्ये 2416 बाधित उपचार घेत आहे. आतापर्यंत 3086 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 60 सह एकूण 66 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.