- अखेर 5 महिन्यानंतर नागरिकांच्या मागणीला आरोग्य विभागाचा प्रतिसाद
मांडवा प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येत असून सदर रुग्णालयात गट ब डॉक्टर यांची नियुक्ती केलेली आहे परंतु कोरोनाचे कारण सांगून येथील डॉक्टर यांची प्रतिनियुक्ती चंद्रपुरला कोरोना नियंत्रण विभागात करून येथील रुग्णालय बंद करण्यात आले होते परंतु सदर रुग्णालयात कोणत्याही अन्य डॉक्टरची नियुक्ती सदर जागेवर करण्यात आलेली नव्हती, त्यामुळे सदर रुग्णालय सद्यस्थितीत बंद अवस्थेत होते.
त्यामुळे परिसरातील नागरिकांना व रुग्णांना सदर बाबीचा फटका बसत होता, तसेच परीसरातील नागरिकांना कोरपना येथे उपचारासाठी जावे लागत होते त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता तसेच कोडशी (बु.) गांधीनगर, तांबाडी, तुळशी येथील रुग्णांना सदर बाबीचा फटका सहन करावा लागत होता तसेच वारंवार रुग्णालय सुरू करण्याची मागणी करून सुद्धा आरोग्य विभागाचे सदर प्रकरणाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे कोडशी (बु.) येथील रुग्णालय हे बंद अवस्थेत होते ही बाब युवा नेते आशिष ताजने यांच्या निदर्शनास परिसरातील नागरिकांनी आणून दिली, त्यांनी सदर प्रकरणाची दखल घेत परिसरातील नागरिकांसह तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे यांना निवेदन दिले व सदर रुग्णालय तात्काळ सुरू करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडे सुद्धा सदर प्रकरणाबाबत पाठपुरावा केला त्यामुळे आरोग्य विभागाने सदर मागणीची दखल घेत कोडशी (बु.) येथील रुग्णालय सुरू केले. यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे व नागरिकांनी आरोग्य विभागाचे आभार व्यक्त केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.