Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गडचांदूर येथील भाजप व्यापारी आघाडीचे अध्यक्ष सुनील चिंतलवार यांचे कोरोना मुळे निधन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शैलेश कोरांगे -प्रतिनिधी कोरपना - गडचांदूर येथील भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष व किराणा व्यापारी सुनील चिंतलवार ५७ यांचे आज पहाटे नागपूर ये...

शैलेश कोरांगे -प्रतिनिधी
कोरपना -
गडचांदूर येथील भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष व किराणा व्यापारी सुनील चिंतलवार ५७ यांचे आज पहाटे नागपूर येथे कोरोना मुळे निधन झाले. पाच दिवसापूर्वी सुनील चिंतलवार यांना ताप व खोकला झाला होता. त्यांनी गडचांदूर येथे उपचार केले, ताप कमी झाला. पण नंतर त्यांची तब्बेत अचानक बिघडली आणि कोरोना टेस्ट पॉजिटिव आली. त्यांना चंद्रपूर येथे नेण्यात आले. तेथे बेड न मिळाल्याने व प्रकृती ढासळत असल्याने नागपुरला नेण्यात आले. परंतु त्यांना ऑक्सिजन मिळाले नाही, अखेर आज पहाटे त्यांची मृत्यूशी झुंज संपली. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील व्यापारी वर्गात हळहळ व्यक्त होत आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top