Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: काम जोखमीचे आहे - ३०० रुपये रोजी द्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अन्यथा संपावर जाऊ, आशा गटप्रवर्तकांनी दिला इशारा शैलेश कोरांगे - प्रतिनिधी कोरपना - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने माझे कुटुंब माझी जबाब...

  • अन्यथा संपावर जाऊ, आशा गटप्रवर्तकांनी दिला इशारा
शैलेश कोरांगे - प्रतिनिधी
कोरपना -
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी ३०० रुपये रोज देण्यात यावे या मागणीसाठी आशा व आशा गटप्रवर्तकांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे यांना निवेदन देण्यात आले. आशा व गटप्रवर्तक नियमित कामे करण्यास तयार आहेत. त्या कामाचा त्यांना मोबदला मिळत आहे. मात्र कोरोना काळात शासनाने जी कामे करून घेतली, त्याचा निश्चित मोबदला ठरविला नाही. या कामाची दखल घेवून मोबदला वाढवून देण्यात येईल, अशी अपेक्षा आशांना होती. शासनाने ३०० रूपये रोज दिला तरच माझे कुटुंब माझी जबाबदारी चा सर्व्हे करणार, अन्यथा नाही अशा इशारा आशा वर्कर व गटप्रवर्तक आयटक संघटना कडून निवेदनातून देण्यात आला. यावेळी कोरपना तालुक्यातील आशागटप्रवर्तक फरजाना शेख, छाया खैरे, सुनिता मडावी, सविता जेनेकर, रेखा शिंदेकरव आशावर्कर योगीता वांढरे उपस्थित होत्या.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top