Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून आता 500 रुपये दंड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आजपर्यंत 36 लक्ष 65 हजार रुपयावर दंड वसूल मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी चंद्रपूर - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडू...

  • आजपर्यंत 36 लक्ष 65 हजार रुपयावर दंड वसूल
मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर -
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भाव काळात मास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून  जिल्हा प्रशासनाने कारवाई करत दिनांक 22 सप्टेंबर पर्यंत 15 हजार 632 मास्क न वापरलेल्या नागरिकांकडून 31 लाख 16 हजार 140 रुपयांचा दंड वसूल केला आहे.तर सार्वजनिक ठिकाणी थुंकलेल्या 355 नागरिकांकडून 49 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.तर इतर कारवाई करत 5 लाख  रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून असे एकूण 36 लाख 65 हजार 910 रुपयांचा दंड जिल्हा प्रशासनाने कारवाई करत वसूल केलेला आहे.

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी काढलेल्या आदेशान्वये सार्वजनिक ठिकाणी, घराबाहेर जेथे लोकांचा वावर आहे, तेथे असताना  मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर 500 रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील कोणत्याही सार्वजनिक अथवा ज्या ठिकाणी लोकांचा वावर जास्त प्रमाणात आहे. अशा जागेच्या ठिकाणी थुंकणेस मनाई असून, थुंकल्यास 500 रु दंड आकारण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

दंड आकारण्याची कारवाई चंद्रपूर शहर महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, गटविकास अधिकारी यांच्यामार्फत 23 एप्रिल पासून करण्यात येत आहे.

असे आहे वसूल केलेल्या दंडाचे विवरण:
दिनांक 22 सप्टेंबर पर्यंत चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपुर अंतर्गत 3 हजार 254 मास्क न वापरलेल्या नागरिकांकडून 6 लाख 49 हजार 40 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकलेल्या 280 नागरिकांकडून 31 हजार 50 रुपयाचा दंड वसूल केला आहे. तर इतर कारवाई करत 66 हजार 900 रुपयाचा दंड वसूल केला असून असा एकत्रित 7 लाख 46 हजार 990  रुपयांचा दंड वसूल केलेला आहे.

नगरपरिषद, नगरपंचायत अंतर्गत 7 हजार 938 मास्क न वापरलेल्या नागरिकांकडून 15 लाख 82 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकलेल्या 67 नागरिकांकडून 15 हजार 150 रुपयाचा दंड वसूल केला आहे. तर इतर कारवाई करत 2 लाख 76 हजार 870 रुपयाचा दंड वसूल केला असून असा एकत्रित 18 लाख 74 हजार 620  रुपयांचा दंड वसूल केलेला आहे.

गटविकास अधिकारी कार्यालयांतर्गत 4 हजार 440 मास्क न वापरलेल्या नागरिकांकडून 8 लाख 84 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकलेल्या 8 नागरिकांकडून 3 हजार 500 रुपयाचा दंड वसूल केला आहे. तर इतर कारवाई करत 1 लाख 56 हजार 300 रुपयाचा दंड वसूल केला असून असा एकत्रित 10 लाख 44 हजार 300  रुपयांचा दंड वसूल केलेला आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top