- गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगिता प्रमोद पिपरे यांची ग्वाही
- स्वच्छ सर्वेक्षणा अंतर्गत पार पडलेल्या ऑनलाईन कार्यशाळेत घेतला सहभाग
गडचिरोली -
गडचिरोली शहराला सर्वांग सुंदर बनवून स्वच्छ सर्वेक्षणात तारांकित मानांकन मिळविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही गडचिरोली नगरपालिकेच्या अध्यक्षा योगिता प्रमोद पिपरे यांनी दिली.
23 सप्टेंबरला राज्य शासनाच्या महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी समाविष्ट स्वच्छ सर्वेक्षण 2021 साठीची कार्यशाळा घेण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यशाळेचे ऑनलाईन स्वरूपात आयोजन करण्यात आले होते. यावेळी गडचिरोली नगरपालिकेच्या अध्यक्षा योगिता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, मुख्याधिकारी संजिव ओहोळ, नोडल अधिकारी तृप्ती मल तसेच आरोग्य व स्वच्छता विभागातील अधिकारी या कार्यशाळेत सहभागी झाले होते.
कार्यशाळेत केंद्रीय गृहनिर्माण, नागरी कार्य व मंत्रालय येथील सचिव व प्रधान सचिवांनी मार्गदर्शन केले. शिवाय स्वच्छ सर्वेक्षण अभियाना अंतर्गत 2020-21 मध्ये करावयाच्या उपाययोजना, विकासात्मक वाटचालीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.






टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.