Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वाघाच्या हल्ल्यात वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा तालुक्यातील नवेगाव गावांतील महिन्यातील दुसरी घटना वाघाच्या हल्यात आता पर्यंत ६ लोक मृत्युमुखी वाचा सविस्तर.... अविनाश रामटेके - प्रति...

  • राजुरा तालुक्यातील नवेगाव गावांतील महिन्यातील दुसरी घटना
  • वाघाच्या हल्यात आता पर्यंत ६ लोक मृत्युमुखी
  • वाचा सविस्तर....
अविनाश रामटेके - प्रतिनिधी
विरूर स्टेशन - राजुरा -
मध्य चांदा वन विभागा अंतर्गत येत असलेल्या विरूर वन परिक्षेत्रातील नियत क्षेत्र कक्ष क्रमांक १४५ मध्ये नवेगाव येथील गोविंदा भीमराव मडावी 70 वर्षे हा जंगलालगत असलेल्या आपल्या शेतात शेतकामाकरिता गेला असता तिथे दबा धरून असलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला करून त्याला जागीच ठार मारल्याची घटना आज साडेतीन च्या सुमारास घडली. 

तसेच नवेगाव लगत असलेल्या भेंडाला येथील वेटी या शेतकऱ्याची जनावर फस्त केल्याची घटना आज सकाळी घडली, सतत होत असलेल्या अशा घटनेमुळे परिसरात भीतीचे वतावरण निर्माण झाले आहे, याअगोदर एका महिन्यांपूर्वी नवेगाव येथील एका शेतकऱ्याचा वाघाने जीव घेतला होता त्यावेळी  परिसरातील नागरिक वनविभागा विषयी संतप्त रोष व्यक्त करून वनविभागाला निवेदन देऊन वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. त्यावेळी 

वनविभागाने पंधरा दिवसांत वाघाचा बंदोबस्त करू अशी आश्वासन दिले मात्र पुन्हा या घटनेत भर पडल्याने  शेतीचे संगोपन व रक्षण करणे हे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच विरुर चे ठाणेदार कृष्णकुमार तिवारी, वडतकर व वनविभागा चे अधिकारी घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा केला. 

विशेष म्हणजे मागील सहा महिण्यापासून राजुरा व विरूर वन परिक्षेत्रात वाघाने धुमाकूळ घातला असून आतापर्यंत ६ लोकांना नाहक जीव गमवावा लागला आहे. या भागात वाघाने प्रचंड दहशत निर्माण केली असून वन विभागातील कर्मचारीही त्याला जेरबंद करण्याकरिता काचोटीने प्रयन्त करीत आहेत. मात्र सदर वाघ वनकर्मचाऱ्यांच्या तावडीत येत नसून लोकांचा नाहक जीव घेत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून आता त्या वाघाला ठार माराच हि मागणी जोर धरू लागली आहे.






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top