- अवैध रेती वाहतुक प्रकरणी गुन्हा दाखल
बल्लारपुर -
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बल्लारशाह कक्ष क्र. ४९४ मध्ये असलेल्या नाल्यात खोदकाम करुन रेती ट्रक्टर क्र. MH-34 L 9468 मध्ये भरुन वाहतुक करीत असतांना संतोष थिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारशाह, क्षेत्र सहाय्यक बल्लारशाह नरेश भोवरे, वनरक्षक पिंपळकर, टेकाम, सुरवसे यांनी जंगलामधील अवैधरित्या रेती उत्खनन करुन ट्रक्टर मध्ये भरले असता मौक्यावरील वाहन ताब्यात घेऊन जप्तीची कार्यवाही करुन नेत असतांना ४-५ मोटार सायकलस्वार जंगलात पोहचले सदर इसमांकडे सत्तुर, तलवार, लाकडी फरेरं, दगड इत्यादी हत्यार होते. त्यापैकी दोघांनी आपले नाव नामे रुपेश मोरे, मनोज क्षिरसागर असे मौक्यावर सांगीतले आमची ट्रक्टर सोडा नाहीतर तुम्हा सर्वांना इथेच तलवारीने मारुन फेकतो प्रसंगवधान ठेवुन आपला व आपल्या कर्मचाच्यांचा जीव धोक्यात न घालता सदर ट्रक्टर नेताना अडथळा न करता भिती पोटी आमचेकडुन आरोपीनी जप्तीमधील ट्रक्टर बळजबरीने ताब्यात घेऊन हत्यारांचा धाक दाखवुन पसार झाले.
रुपेश मोरे व मनोज क्षिरसागर आरोपींवर वनविभागातर्फे भारतील वन अधिनियत १९२७ चे कलम २, २६(१) डी, २, २६(१) जी, ४१,४२ आणि ५२ अन्वये वनगुन्हा क्रमांक १२/१४ दिनांक २६/०९/२०२० नोंद करण्यात असून पोलीस स्टेशन बल्लारपुर येथे संबंधित आरोपी यांचेवर भारतीय दंडसंहिता ३७९,१८६,५०६,३४ व भारतील हत्यार कायदा १९५९ कलम ४,२५ अन्वये जप्त शासकिय संपत्तीची चोरी करणे व शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याची कलमे लावुन पोलिस स्टेशन बल्लारपुर येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पोलिस निरीक्षक एस.एस.भगत प्रकरणाचा तपास करीत आहे. सदर वनगुन्हा प्रकरणी उपवनसंरक्षक मध्य चांदा अरविंद मुंडे यांचे मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा पुढील तपास संतोष तिथे वन परिक्षेत्र अधिकारी बल्लारशाह करीत आहे.






टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.