Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: 3 महिने झाले तरी विवाहितेचा शोध लागला नाही
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर आमरण उपोषण करण्याचा बेपत्ता विवाहितेचा कुटुंबाचा ईशारा अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी राजुरा - राजुरा ...

  • गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर आमरण उपोषण करण्याचा बेपत्ता विवाहितेचा कुटुंबाचा ईशारा

अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा तालुक्यातील चुनाळा येथील विवाहीत महिला तिन महिन्यापासुन बेपत्ता असुन राजुरा पोलीस स्टेशनला दि. 23 जून 2020 ला तक्रार दिली होती. तक्रार देऊन, सतत पोलीस स्टेशन, पोलीस अधीक्षक कार्यालयात चकरा मारुनही समाधानकारक व संशयीतांची चौकशी केली जात नाही आहे असा आरोप बेपत्ता विवाहिते चे वडील दादाजी टोंगे रा. केसुर्ली ता. वणी, जि.यवतमाळ यांनी केला आहे. जय भवानी कामगार सेना अध्यक्ष सुरज ठाकरे यांना सहकार्य करण्याची विनंती त्यांनी केली. तेव्हा सुरज ठाकरे यांनी तात्काळ जय भवानी कामगार सेनेचे महेश हजारे यांना सांगीतले व पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांच्याशी भेटुन संशयीतांची चौकशी करावी अशी विनंती करण्यास सांगीतले. महेश हजारे यांनी पिढीत कुटुंबीयांना सोबत घेऊन सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची भेट घेतली असता, कार्यात तत्परता दाखवत खैरे साहेबांनी राजुरा पोलीस स्टेशन येथून सदर प्रकरणाची माहिती घेतली व संशयीतांची चौकशी करा व बेपत्ता विवाहिताचा मोबाईल स्ट्रेस करुन शोध घ्या असे आदेश दिले. सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी तात्काळ दखल घेतली त्यामुळे विवाहीतांचे वडील यांनी समाधान व्यक्त करत पाणावलेल्या डोळ्यांनी आभार व्यक्त केले. यावेळी बेपत्ता मुलीचा शोध लवकर न घेतल्यास गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा बेपत्ता विवाहितेचा कुटुंबानी दिला. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top