Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा येथील नवीन उपजिल्हा रुग्णालयाच्या ईमारतीत 100 खाटाचे कोविड सेंटर सुरू करावे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
माजी आमदार अँड संजय धोटे यांची जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी राजुरा - कोरोनाचा वाढता प्रादुर्भ...

  • माजी आमदार अँड संजय धोटे यांची जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी
अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी
राजुरा -
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता कोरोना रुग्णासाठी बेड ची कमतरता भासून राहली आहे, राजुरा येथील नवीन उपजिल्हा रुग्णालयाची ईमारत असून यानुषंगाने या इमारतीत 100 बेडची व्यवस्था होईल एवढी मोठी ईमारत असून सदर ईमारतीत प्रशस्त खोल्या सुध्दा आहे तरी या इमारतीत 100 खाटचे कोविड सेंटर बनवून रुग्णाची गैरसमज दूर करावी अशी मागणी माजी आमदार अँड संजय धोटे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

माजी आमदार अँड यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पार्टीचे शिष्टमंडळ आज जिल्हाधिकारी यांना भेटून विविध समस्या संदर्भात अवगत केले, राजुरा तालुक्यात रुग्णाची संख्या वाढत असल्याने, सदर इमारतीत बेड उपलब्ध करून देण्यास व ईतर व्यवस्था केल्यास सदर इमारतीचा उपयोग होऊ शकेल, याबाबतची माहिती पालकमंत्री यांना सुद्धा देण्यात आली आहे, तसेच मागणी सुध्दा करण्यात आली आहे, राजुरा तालुक्यातील सास्ती, धोपटाळा येथे WCL चे रुग्णालयाच्या इमारती मध्ये सुद्धा कोविड सेंटर म्हणून रुग्णालय म्हणून वापरता येईल, त्या रुग्णालयात पण कोविड रुग्णासाठी सोयीस्कर होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले,

शिष्टमंडळा मध्ये माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या सह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अरुण मस्की, जिल्हा परिषद सभापती सुनिल उरकुडे, नगर सेवक व व्यापारी एसोसोसिएशन चे अध्यक्ष राधेश्याम अडाणीया, भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य सुरेश रागीट, भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर आदी उपस्थित होते.






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top