Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरोना व्हॅक्सीन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मुंबईतील केईएम रुग्णालयात कोरोना लस कोव्हिडशील्डचे मानवी परीक्षण सुरू तीन स्वयंसेवकांना दिली जाणार लस पुण्यातील सीरम इंस्टिट्यूटने ब्रिटिश स...

  • मुंबईतील केईएम रुग्णालयात कोरोना लस कोव्हिडशील्डचे मानवी परीक्षण सुरू
  • तीन स्वयंसेवकांना दिली जाणार लस
  • पुण्यातील सीरम इंस्टिट्यूटने ब्रिटिश स्वीडिश फार्मा कंपनी Astra Zeneca सोबत कोव्हिड 19 लस तयार करण्यासाठी भागीदारी
मैथिली माहेश्वरी - प्रतिनिधी
मुंबई -
कोरोना लसीची चाचणी आता मुंबईत सुरू झाली आहे. केईएम रुग्णालयात कोरोना लस कोव्हिडशील्डचे मानवी परीक्षण सुरू करण्यात आले आहे. कोव्हिशिल्ड लशीची ही तिसऱ्या टप्प्यातील चाचणी आहे. आज म्हणजेच शनिवारी तीन स्वयंसेवकांवर या कोरोना लसीची चाचणी घेतली जाणार आहे.

तर आरटीपीसीआर आणि अँटिबॉडीज चाचणी निगेटिव्ह आलेल्या तीन स्वयंसेवकांना आज लस टोचण्यात येईल. लस दिल्यानंतर तिघांवर काही परिणाम होतो का, याची तपासणी करण्यात येणार आहे. एक महिन्यांने पुन्हा लसीचा दुसरा डोस दिला जाणार असल्याची माहिती माहिती केईएम रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.

तसेच आतापर्यंत 13 लोकांवर स्क्रीनिंग करण्यात आली आहे. यामध्ये 10 लोकांची स्क्रीनिंग आतापर्यंत पूर्ण झालेली आहे. तसेच पुण्यातील सीरम इंस्टिट्यूटने ब्रिटिश स्वीडिश फार्मा कंपनी Astra Zeneca सोबत कोव्हिड 19 लस तयार करण्यासाठी भागीदारी केली आहे. ही लस ऑक्सफोर्ड यूनिव्हिर्सिटीमध्ये तयार करण्यात आली आहे.

मानवी परीक्षण प्रक्रियेमध्ये एका इतर व्यक्तीला प्लेसीबो मिळणार आहे. केईएम हे पहिले रुग्णालय आहे. जिथे सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाद्वारे निर्मित मानवी परीक्षण केले जाई. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीद्वारे कोव्हिडशील्ड लस विकसित करण्यात आली आहे आणि भारतातील पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट तयार करत आहे.

दरम्यान देशभरातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तसेच मुंबईतील कोरोना रुग्णही सातत्याने वाढत आहे. देशभरातील कोरोनाचा प्रभाव हा कमी होताना दिसत नाहीये. देशात आतापर्यंत 59 लाख 1 हजार 571 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये 48 लाख 46 हजार 168 लोकांनी कोरोनावर मात कतेली आहे. तर 93 हजार 410 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top