Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरोनामुळे साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते लेखक नवनाथ गोरे यांच्यावर हाती कुदळ घेऊन पोट भरण्याची वेळ
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
लॉकडाऊनमुळे नोकरी गेली आता मोलमजुरी करून दररोज कमावतात 200 रुपये जीवनातील कटू वास्तवावर आधारित ‘फेसाटी’ कादंबरी लिहून देशभरातील साहित्यिक वि...

  • लॉकडाऊनमुळे नोकरी गेली
  • आता मोलमजुरी करून दररोज कमावतात 200 रुपये
जीवनातील कटू वास्तवावर आधारित ‘फेसाटी’ कादंबरी लिहून देशभरातील साहित्यिक विश्वात आपला ठसा उमटवणारे साहित्यिक प्रा. नवनाथ गोरे यांच्यावर सध्या लेखणीऐवजी हातामध्ये कुदळ, फावडे घेण्याची वेळ आली आहे. कोरोनाची साथ, त्यापाठोपाठ झालेले लॉकडाऊन यामुळे गोरे यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आणि नंतर सुरू झाली ससेहोलपट.

सन २०१८ मध्ये साहित्य विश्वातील अत्यंत प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार नवनाथ गोरे यांच्या ‘फेसाटी’ कादंबरीला मिळाला होता. जीवनातील कटुसत्यावर भाष्य करणारी कादंबरी अशा शब्दांत अनेक साहित्यिकांनी त्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. गोरे यांची ही कादंबरी प्रचंड गाजली. घरात अठराविश्वे दारिद्य्र असलेल्या नवनाथ यांचे या कादंबरीने आयुष्य बदलले.

कादंबरीच्या यशानंतर त्यांना अहमदनगर जिल्ह्यातील लोणी या गावी पद्मभूषण विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयात तासिका तत्त्वावर सहयोगी प्राध्यापकाची नोकरी लागली. दरमहा १० हजार रुपये वेतन त्यांना मिळत होते. आयुष्याचा गाडा रुळावर आला. हा आनंद फार काळ टिकला नाही. परंतु अवघ्या सहा महिन्यांनंतर कोराेना आला, पाठोपाठ लॉकडाऊन लादले गेले. त्यांना नोकरी गमवावी लागली. त्यानंतरच्या ‘लॉकडाऊन’च्या सहा महिन्यांच्या काळात आपले कुटुंब चालवण्यासाठी त्यांच्यावर मोलमजुरी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. सध्या दिवसाला आठ ते दहा तास राबून अवघ्या २०० रुपयांवर त्यांना उदरनिर्वाह करावा लागत आहे.

कलावंतांप्रमाणे लेखकांनाही मानधन द्या : गोरे
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात निगडी बुद्रुक या गावातील नवनाथ यांनी मोठ्या कष्टाने एम.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. घरात वृद्ध आई, मोठा अपंग भाऊ व शिक्षण घेणाऱ्या लहान भावांचे कुटुंब आहे. सरकारने कलावंतांप्रमाणेच लेखकांनाही मानधन द्यावे, अशी मागणी नवनाथ गोरे यांनी केली आहे.


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top