Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोर्टाच्या पायरीची वकिलांनाच भीती
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स नागपूर - मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सोमवारपासून शहरातील जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायालयांचे कामकाज सुरू...

आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
नागपूर -
मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सोमवारपासून शहरातील जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायालयांचे कामकाज सुरू झाले. परंतु, शहरातील करोनाचा वाढता उद्रेक आणि त्याची भयावहता पाहता वकिलांनी सावध भूमिका घेतली आहे. पहिल्या दिवशी न्यायालयात वकिलांची फारशी गर्दी नव्हती. करोनामुळे पक्षकारांसोबतच सध्या वकिलांनाही कोर्टाच्या पायरीची भीती वाटू लागली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

हायकोर्टाच्या नव्या आदेशानुसार, उपराजधानीतील जिल्हा न्यायालय हे 'ग्रुप-ए' वर्गात मोडते. येथील सर्व न्यायाधीश आणि वरिष्ठ न्यायिक अधिकाऱ्यांना उपस्थित राहणे आवश्यक आहे. मात्र, कनिष्ठ कर्मचाऱ्यांची संख्या कमी ठेवण्यात आली आहे. यापूर्वीच्या नियमानुसार केवळ १५ टक्के कनिष्ठ कर्मचारी कार्यरत होते. आता हा आकडा वाढवून ३० टक्के करण्यात आला आहे. मात्र, खटल्यांची तसेच अन्य नियमित दिवाणी प्रकरणांची सुनावणी अद्याप सुरू झालेली नाही. नव्या नियमानुसार केवळ तातडीची आणि अंतिम युक्तिवादाचीच प्रकरणे हाताळली जातील. त्यामुळे वकिलांना फारशा प्रकरणांमध्ये हजर राहणे आवश्यक नाही. याखेरीज, शहरातील करोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असून रुग्णांच्या आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीती आहे. त्यामुळे एकंदरीतच सोमवारी न्यायालयातील गर्दी फारशी वाढल्याचे चित्र दिसून आले नाही. याबाबत जिल्हा बार असोसिएशनचे सचिव अॅड. नितीन देशमुख म्हणाले, 'आजपासून सगळी न्यायालये सुरू झाली. मात्र, केवळ तातडीची प्रकरणे हाताळली जात आहेत. तसेच शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढलाय. त्यामुळे पहिल्या दिवशी फारशी गर्दी नव्हती. प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक ती सगळी काळजी घेतली जात आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top