Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चंद्रपूर जिल्हातील राष्ट्रीय महामार्ग क्र NH-930 D व NH-353 ब रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी - आमदार सुभाष धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी राजुरा - आमदार लोकप्रिय सुभाष धोटे यांनी आपल्या क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्ग क्र NH-930 D बामणी ते राजुरा, ...

अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी
राजुरा -

आमदार लोकप्रिय सुभाष धोटे यांनी आपल्या क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्ग क्र NH-930 D बामणी ते राजुरा, राजुरा ते लक्काकोट 19 ते 52.158 मधील एकूण 33.158 किमी तसेच NH-353 B राजुरा ते गोविंदपूर किमी 32.5 ते 89.491 मधील किमी 56.991 या रस्त्याची मोठ्याप्रमाणात दुरवस्था झालेले आहे. रस्त्यावर मोठ-मोठी जीव घेणी घड्डे असून जड वाहतूक तसेच सर्व सामान्य नागरिकांना रस्त्याने प्रवास करणे घातक ठरत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली आहे. हे महामार्ग परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन कामकाजासाठी, प्रवासी व जडवाहतूकीसाठी कायम वर्दळीची आहेत. परिसराच्या विकासासाठी हे महामार्ग अध्ययावत असणे गरजेचे आहे. तेव्हा महामार्गाची दैनिय परिस्थिती लक्षात घेता तातडीने कारवाई करुन महामार्ग दुरुस्त करण्याची मागणी आमदार सुभाष धोटे यांनी केली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top