Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कुख्यात गुंडाची दिवसाढवळ्या धारदार शस्त्रानं हत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नागपुरात थरार! कुख्यात गुंडाची दिवसाढवळ्या धारदार शस्त्रानं हत्या जुगार अड्डा चालक व कुख्यात बाल्या ऊर्फ किशोर बिनेकर याची धारदार शस्त्रांनी...

  • नागपुरात थरार!
  • कुख्यात गुंडाची दिवसाढवळ्या धारदार शस्त्रानं हत्या
  • जुगार अड्डा चालक व कुख्यात बाल्या ऊर्फ किशोर बिनेकर याची धारदार शस्त्रांनी वार करुन निर्घृण हत्या
  • बघा लाइव्ह व्हिडीओ....
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
नागपूर -
जुगार अड्डा चालक व कुख्यात बाल्या ऊर्फ किशोर बिनेकर याची धारदार शस्त्रांनी वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली. ही थरारक घटना शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास महाराजबाग रोडवरील बोले पेट्रोलपंपासमोर घडली.

दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी बाल्या हा काळ्या रंगाच्या कारने जात होता. बोले पेट्रोल पंपाजवळ सिग्नल लागल्याने तो थांबवल्या याच वेळी मोपेड व बुलेटवर पाच जण आले. त्यांनी बाल्या याला कारमधून बाहेर काढले. त्याच्यावर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले.

रक्ताच्या थारोळ्यात बाल्या खाली पडला. बाल्याचा मृत्यू झाल्याची खात्री पटताना मारेकरी मोपेड व बुलेटने वेगवेगळ्या दिशेने पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विनीता शाहू, गुन्हेशाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुधीर नंदनवार यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी बाल्याचा मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करून मोरकऱ्यांचा शोध सुरू केला आहे. बाल्याच्या हत्येप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

येथे क्लिक करून बघा हत्येचा लाईव्ह व्हिडीओ

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top