- कोरपना नगरपंचायत - बांधकाम ठेकेदाराची मनमानी भोवणार ?
- एकाच ठेकेदाराला कोट्यवधींची कामे
- नगरसेवक सुहेल अलींची पोलिसात तक्रार
चंद्रपूर -
कोरपना नगरपंचायत वैशिष्टपूर्ण निधी सन 2017-18 मध्ये तत्कालीन आमदार संजय धोटे व पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून तीन कोटीचा निधी पंचायतीला उपलब्ध झाला प्रथम ही कामे शासनाने नगरपंचायत कडे वर्ग केले मात्र तांत्रिक मनुष्यबळा अभावी शासना ने शुद्धीपत्र काढून नव्याने वैशिष्टपूर्ण विकासाची कामे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कामाचे आराखडे अंदाजपत्रक तयार करून तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेसाठी तयार करण्यात आले होते. नगरपंचायतीने स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने निविदा घेण्याचे शासनाचे निर्देश आहे. मात्र कोरपना येथील नगरपंचायतीने अंदाजपत्रकीय दरात एकाच ठेकेदाराला कोट्या अवधी रुपयाचे कामे एकाच ठेकेदाराकडून करण्यामागे पदाधिकाऱ्यांचे हीत जोपासण्याचे कार्य केल्यामुळे गावामध्ये उलट सुलट चर्चेला ऊत आले. मात्र ठेकेदार भूषण ईटणकर यांनी या प्रकरणात रिट पिटीशन मा उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे क्र 2233/२०१९ ला रिट दाखल केली व नगरपंचायतीच्या दिनांक 7 मार्च 2019 च्या कार्यदेश पत्र क्रमांक ४४९५ ला आवाहन दिले सन 2017-18 पासून देना कामासाठी उपलब्ध झालेला 1.39 कोटीचे कामे न्यायालय आदेश प्रतीक्षेत असताना कोरपना नगरपंचायतीचे सिमेंट काँक्रेट रस्ते नाली बांधकामे पण 2019- 20 जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात पूर्ण करण्याचा सपाटा लावून न्यायालयाच्या निर्देशांची अवहेलना व मुख्याधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवीत लेआउट तांत्रिक मार्गदर्शन प्रशासनिक आदेश न घेता स्वतःच्या मर्जीने कामे उरकविण्याची घाई केली. यामध्ये मोठा गैरव्यवहार व शासनाची दिशाभूल करण्याचा पूर्ण प्रयत्न ठेकेदाराने केला. अंदाजपत्रकाच्या तरतुदीनुसार कामे झालेली नाही व शासनाच्या तांत्रिक मंजुरी प्रमाणे साहित्याचा वापर केलेला नाही. रेती ऐवजी दगडी चुरीचा वापर करून निकृष्ट बांधकामे केली आहे. काम करण्यापूर्वी कोणतीही तांत्रिक परवानगी घेतली नाही, हे विशेष. नगरपंचायत मुख्याधिकारी व शाखा अभियंता या प्रकरणात अनभिज्ञ कसे? नगरसेवकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने शाखा अभियंता व लिपिकांनी दिनांक 7/9/2020 रोजी नगर पंचायत क्षेत्रातील वार्ड क्रमांक 1, वार्ड क्रमांक 3, वार्ड क्रमांक 4, वॉर्ड क्रमांक 11, वॉर्ड क्रमांक 8 पाहणी केली असता मुख्याधिकारी व प्रशासकीय आदेश नसताना काम केल्याचे उघड झाले. मुख्याधिकारी यांनी ठेकेदार भूषण ईटणकर यांना तात्काळ विनापरवानगी सुरू असलेली कामे बंद करून दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश दिनांक 10 सप्टेंबर 2020 दिले. ठेकेदार यांनी केलेली अनेक कामे निकृष्ट अंदाजपत्रकानुसार केली नसल्याने ठिकाणी नाल्या पडझड रस्ता उखडल्या चे चित्र दिसून येते. यापूर्वी झालेल्या अनेक कामांमध्ये घोळ असून अंदाज पत्रका प्रमाणे कामे झालीच नाही. निकृष्ट बांधकाम प्रत्यक्ष मोजमाप यामध्ये फरक असून मोठ्या प्रमाणात मोजमाप फुगवून कामात तफावत असल्याने मोठा घोड करून वेगवेगळ्या निधीमध्ये हेराफेरी कौन्सिल सभेच्या ठरावानुसार अंमलबजावणी न झाल्यामुळे पंचायतीला शासकीय निधी गैरवापर आर्थिक नुकसानीचा फटका झाल्या ने पोलीस निरीक्षक कोरपना व जिल्हाधिकारी यांना नगरसेवक सुहेल आबिद अली यांनी तक्रार दाखल करून चौकशी व झालेल्या गैरव्यवहार व निकृष्ठ कामा बाबत ठेकेदार यांचे वर गुन्हे दाखल करुन कार्यवाही ची मागणी केल्या ने नगर पंचायत गोटात खळबळ माजल्याने तो मी नव्हेच ची भुमीका घेतांना दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.