- डॉक्टर संजय पुरी यांच्या कार्याची शासनाने दखल घ्यावी
- डॉक्टर संजय नामदेवराव पुरी
- एक वादळी व्यक्तिमत्व
ना कोणाच्या अध्यात ना मध्यात. आपण बरे आणि आपले काम बरे. सर्वच काम नीटनेटके पाहिजे असायचे. स्वप्न मोठी होती आणि ते स्वप्न पुरी करण्यातच तो नेहमीमग्न असे. त्यासाठी त्यांनी कोणाचीही तमा बाळगली नाही. जसा धो-धो पाऊस पडतो नी क्षणात शांत होतो तसाच तो होता.त्यांच्या रागाला काही सीमा नव्हती तशीच त्याच्या जोक्स नाही सीमा नव्हती. सर्वच गोष्टी त्यांनी आपल्या मनाप्रमाणे केल्या स्वच्छंदी होऊन तरी प्रामाणिक पणे. लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न होती तशीच सरस्वती देवी ही प्रसन्न होती.
तो गेला अगदी अचानक काळाच्या पडद्याआड गेला. त्याच्या ह्या अचानक जाण्याने सर्व स्तरावर वादळ माजले आहे. खरंतर स्वताच्या मृत्यु ची चाहुल त्याला कधीच लागली होती तरी तो इतरांना त्यापासुन वाचवण्यात मग्न होता. कोव्हीड पासुन त्यांनी भरपूर लोकांना बरे केले. चाळीस वर्ष त्यांनी वैद्यकीय व्यवसायाला दिलीत. त्याच्या ह्या त्यागाला सलाम. शासनानेही त्यांच्या ह्या कार्याची दखल घ्यायला हवी.
सर्व जग त्यांनी पादाक्रांत केले होते. तरी त्यांचे स्वताचे जग मात्र छोटेच होते. तो आयुष्यात सर्व स्तरावर जिंकला होता. पण आयुष्याच्या ह्या लढाईत तो हरला असे म्हणता नाही येणार. तरी अखेर काळाने घाला घातलाच नी देवाने त्यांना आपल्या कड़े बोलावून घेतले. दिनांक १० सप्टेंबर २०२० त्यांच्या साठी नी सर्वां साठी काळरात्र ठरली. डॉक्टर सर्वांना सोडून गेले, पण आजही सर्वांच्या हृदयात कायम त्यांच्या आठवणी कायम आहेत हि पोकळी पोकळी कधीच भरुन न येण्यासारखी आहे.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.