Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ओबिसी समन्वय समिती राजुरा तालुका महासचिव सुरज गव्हाने यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातुन साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वाढदिवसानिमित गरजुवंत मुलांना शैक्षणिक साहित्याच वाटप मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी राजुरा - ओबीसी समन्वय समिती राजुरा तालुका महासचिव सुरज म...

  • वाढदिवसानिमित गरजुवंत मुलांना शैक्षणिक साहित्याच वाटप
मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी
राजुरा -
ओबीसी समन्वय समिती राजुरा तालुका महासचिव सुरज मारोती गव्हाने यांच्या वाढदिवशी वरुर येथील विशाल शेंडे यांचे संत तुकोबाराया नावाने वाचनालय चालवत असून तिथे गरजूवंत मुलांना मोफत शिकवणी वर्ग चालू केली आहे या सर्वाची दखल घेत व नेहमी सामाजिक कामात अग्रेसर असणारे सुरज गव्हाने यांनी तेथील मुलांना शैक्षणिक साहित्याच वाटप करण्यात आले व वाचनालयाला छत्रपती शाहू महाराजांचा फोटो भेट देण्यात आले या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून दिनेश पारखी ता. अध्यक्ष मराठा सेवा संघ, ओबीसी समन्वय समिती राजुरा चे सल्लागार केतन जुनघरे,  ओबिसी समन्वय समिती राजुरा तालुका अध्यक्ष उत्पल गोरे, वाचनालयाचे व मोफत शिकवणी वर्ग सुरू करणारे तसेच ओबीसी समन्वय समिती राजुरा तालुका उपाध्यक्ष विशाल शेंडे  सुरज भांबरे, युवा कवि आदित्य आवारी सहित ओबीसी समन्वय समिती चे सर्व पदाधिकारी व वाचनालयातील मुले उपस्थित होते.





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top