चंद्रपूर -
सध्या कोरोनाच्या पादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून महानगर, शहरें पाठोपाठ आता ग्रामीण भागातही परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. असे असतांनाही आपण आपल्या निकटवर्तीयांना, मित्रांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी घराबाहेर पडत आहोत. हेच नाही तर शुभेच्छा फलकावर अनावश्यक खर्च सुद्धा करीत आहोत. एकीकडे आपला देश डिजिटल इंडियाच्या दिशेने वाटचाल करतांना शुभेच्छांचेही डिजिटलायझेशन होत आहे. अत्यंत कमी दरात डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आप्तस्वयिकांना, मित्र-मैत्रिणीला शुभेच्छा देण्यास सुरुवात झाली आहे. तरीही आपण शुभेच्छा फलकांवर भरमसाठ खर्च करीत आहोत. यापुढे शुभेच्छा देण्यासाठी भ्रमणध्वनी किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करावा, तसेच शुभेच्छा फलक न लावता त्यासाठी येणारा येणारा खर्च कोविड-१९ च्या बाधितांच्या उपचाराकरिता किंवा गरजूंना मदत करून करण्याचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर महानगर डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.