Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: फळ विक्रेत्यांनीं कोरोनाला गांभीर्याने घ्यावे - राहुल पावडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
महानगर भाजपाने साजरा केला सपनाताई मुनगंटीवार यांचा वाढदिवस भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर जिल्हा महानगर डॉ. मंगेश गुलवाडे यांची उपस्थिती मनोज स...

  • महानगर भाजपाने साजरा केला सपनाताई मुनगंटीवार यांचा वाढदिवस
  • भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर जिल्हा महानगर डॉ. मंगेश गुलवाडे यांची उपस्थिती
मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर -
कोरोनाचे संकट अजून टळले नाही. आता मीच माझा रक्षक या सोबत मीच माझ्या परिवाराचा रक्षक होणे गरजेचे आहे. अश्यात फळ विक्रेत्यांची पण जवाबदारी वाढली आहे. फळ विक्रेत्यांनी कोरोनाला गांभीर्याने घ्यावे, असे प्रतिपादन उपमहापौर राहुल पावडे यांनी केले.

ते महानगर भाजपा तर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आ. सुधीर मुनगंटीवार यांची धर्मपत्नी सौ. सपनाताई मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्य आयोजित मास्क व आर्सेनिक अलबम वितरण कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर जिल्हा महानगर डॉ मंगेश गुलवाडे तर अतिथी म्हणून नगरसेवक सुभाष कासंगोट्टूवार, प्रशांत चौधरी, नगरसेविका सविता कांबळे, वंदना तिखे, भाजपा प्र.का. सदस्य राजेंद्र गांधी, मंडळ अध्यक्ष प्रा.रवी जोगी, प्रशांत विघ्नेश्वर, रामकुमार अकापेलिवार, भाजयुमोचे सुनील डोंगरे, सुशांत आकेवार आणि आदित्य डवरे यांची उपस्थिती होती.

पावडे म्हणाले, फळविक्रेते महानगरात फिरून व्यवसाय करतात. त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका आहे. तेवढाच धोका फळ विकत घेणाऱ्याला आहे. दारावर ही खरेदी मातृशक्ती करीत असते. त्यामुळे बाजारात गर्दी कमी होते. असे असले तरी काळजी घेणे गरजेचे आहे. म्हणून सौ सपनाताई मुनगंटीवार यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आम्ही फळ विक्रेत्यांना जागरूक करण्यास आलो, असे ते म्हणाले. यावेळी राहुल पावडे यांचे हस्ते मास्क वितरण तर महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ गुलवाडे यांचें हस्ते आर्सेनिक अलबम ३० या होमिओपॅथी औषधीचे वितरण करण्यात आले.

यावेळी डॉ मंगेश गुलवाडे यांनी कोरोनाची सद्याची स्थिती विशद करीत आर्सेनिक अलबम बाबत माहिती दिली. कार्यक्रमाला उपस्थित नगरसेवक व नगरसेविकांच्या हस्ते ही हाथठेलेवाल्यांना मास्क आर्सेनिक अलबम चे वितरण करण्यात आले. संचालन विघ्नेश्वर यांनी केले. सुभाष कासंगोट्टूवार यांनी आभार मानले. यावेळी उपस्थित सर्वांनी सौ सपना सुधीर मुनगंटीवार यांना शुभेच्छा दिल्या.


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top