Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा येथे मिशन शिष्यवृत्ती ऑनलाईन वर्ग सुरु
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गटसाधन केंद्राचा नाविण्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद वैभव वैद्य - शहर प्रतिनिधी राजुरा -  राजुरा पंचायत समितीचे गट शिक्षणा...

  • गटसाधन केंद्राचा नाविण्यपूर्ण उपक्रम
  • विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद
वैभव वैद्य - शहर प्रतिनिधी
राजुरा - 
राजुरा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी विजय परचाके यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाखाली मिशन शिष्यवृत्ती इयत्ता 5 वी या ऑनलाईन नाविण्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. इयत्ता 5 वी ला शिकविणारे शिक्षक व शिष्यवृती परीक्षेकरिता बसणारे विद्यार्थी यांच्याकरीता zoom app द्वारे ऑनलाईन लाईव्ह शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात आले. या तालुकास्तरीय वर्गाची सुरुवात दिनांक 5 सप्टेंबर 2020 पासून तालुक्यात करण्यात आली. हे वर्ग दर शनिवारी गणित, बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी व मराठी या विषयावर सकाळी 9 ते 10 या वेळात आयोजित केले जात आहे. तालुक्यातील जि.प. च्या 20 शाळेतील 24 शिक्षक व 65 विद्यार्थी या उपक्रमांतर्गत zoom app द्वारे मार्गदर्शन वर्गाचा लाभ घेत आहेत. यात तालुकास्तरावरून तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून गिरीधर पानघाटे, अली रजा अजाणी, राम माणिक, अनिल मत्ते, पुष्पकुमार मेंढे हे कार्य करीत आहे. यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी संजय हेडाऊ, श्रीराम मेश्राम, सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक तथा शिक्षक यांचे उपक्रमास सहकार्य लाभत आहे. उपक्रमाचे नियोजन, आयोजन व यशस्वितेकरिता गटसाधन केंद्रातील साधनव्यक्ती गीता जांबुलवार, रिता देरकर, ज्योती गुरुनुले, मुसा शेख, राकेश रामटेके, सुर्यकांत ढगे हे परिश्रम घेत आहेत. या उपक्रमाने स्पर्धा परीक्षा तयारी सोबतच विद्यार्थी तंत्रस्नेही बनण्यासही मदत होत आहे. या उपक्रमास शिक्षक व विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्वत्र या उपक्रमाचे कौतुक होत आहे.


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top