- माजी राष्ट्रपती स्व. प्रणव मुखर्जी व कोरोना योध्याना वाहली श्रध्दांजली
यावेळी आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर च्या मुख्याध्यापिका नलीनी पिंगे, आदर्श हायस्कूल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर, छ. शिवाजी महाराज स्कॉऊट यूनिट लिडर बादल बेले, रुपेश चिडे, राष्ट्रमाता जिजाऊ यूनिट लिडर वैशाली चिमुरकर, कब बुलबुल यूनिट लिडर सुनीता कोरडे, अर्चणा मारोटकर, वैशाली टिपले, रोशनी कांबले, ज्योती कल्लूरवार, आदीसह शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते. यावेळी लॉर्ड बेडेन पॉवेल, लेडी बेडेन पॉवेल व स्व. प्रणव मुखर्जी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. सरस्वती वंदना, गुरूवंदना, रामधून, नामधुन, सर्वधर्म प्रार्थना, एक मिनिट मौन, शांतीपाठ आदी घेण्यात आले. देशात सुरू असलेल्या कोरोना जागतिक महामारीच्या संकटाचा सामना करतांना अनेक कोरोना योद्धानी आपल्या प्राणाची आहुति दिली. तसेच भारत देशाचे माजी माजी राष्ट्रपती स्व. प्रणव मुखर्जी यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. सचिव भास्कर येसेकर, हरीता फटाले, रितु दुपारे, सुप्रिया रागिट, दिव्या बावणे, वेदांत इंगडे, रेहान शेख, सानिया मूद्देवार आदींचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सांगता वृक्षारोपणाने करण्यात आली.



टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.