- फलक लावण्याची गरज
![]() |
| पकडीगुड्डम प्रकल्पाचा लोणी कडे जाणारा दुसरा क्रमांक चा कालवा बुजला |
मलनाला प्रकल्प १९८५ साली बांधून तयार झाला. तर कोरपना तालुक्यातील पकडीगुडम प्रकल्प १९९२ ला पूर्णत्वास आला. तेव्हापासून हा प्रकल्प शेती सिंचन व उद्योगासाठी वरदान ठरत आहे. मात्र या प्रकल्पाकडे संबंधित अधिकार्याचे पाहिजे तसे लक्ष होत नसल्याने प्रकल्प दुरावस्थे कडे वाटचाल करित आहे. आज घडीला प्रकल्प स्थानी कुठलाही माहिती फलक नसण्याबरोबरच सुरक्षारक्षकही या स्थळी तनात नाही. त्यामुळे प्रकल्प सुरक्षा राम भरोसे पडली आहे. दोन्ही प्रकल्पाचे कालवे ही अस्वच्छतेने बरबटलेले आहे. पकडी गुड्म प्रकल्पाचा लोणी कडे जाणारा दुसरा क्रमांक चा कालवा ही बुजला गेला असल्याने शेतकऱ्याच्या बांधावर कधीच पाणी पोहोचत नाही. त्यामुळे सिंचन तर दूर थेब भर पाणी ही त्या कालव्याने कधी पाहायला मिळत नाही. या दोन्ही प्रकल्पाचे कार्यालय एकाच स्थळी दोन वेग वेगळ्या ठिकाणी आहे. मात्र येथे अनेक कर्मचाऱ्यांची पदे वर्षानुवर्षांपासून रिक्त आहे. तसेच दोन्ही प्रकल्पाचा भार एकाच अभियंत्याच्या भरोशावर सुरू आहे. या प्रकल्पाच्या विकासाच्या दृष्टीने अद्यापही कुठलीच प्रक्रिया करण्यात आली नाही.त्यामुळे येथील भौतिक विकासही थांबला गेला आहे. त्यामुळे या प्रकल्पांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
(या ठिकाणी अल्प दरात जाहिराती करिता संपर्क करा.)



टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.