- वरोरा पोलीसासांठी आव्हान
प्राप्त माहिती नुसार वरोरा - माढेळी मार्गावरील मौजा पांझूर्णीच्या उत्तर दिशेवरील शेत शिवार सर्वे नं - १५९/३, आराजी १.६६ हे. आर (१६६०० चौ.मी.) चे भोगवटदार अब्दुल कादर शेख मोहम्मद हे होते. यांची मालमत्ता व तेथील सर्व चीज वस्तू थकीत कर्जाच्या वसुलीसाठी तत्कालीन नायब तहसीलदार रमेश कोळपे वरोरा यांनी १०/७/२०१८ ला पंचासमक्ष श्री आनंद नागरी सहकारी बँकेच्या ताब्यात दिले होते. ही मालमत्ता बँकेच्या ताब्यात असताना ६ सप्टेंबर २०२० रोजी पांझूर्णी येथून अज्ञात चोरांनी किर्लोस्कर कंपनीचा मोठा जनरेटर चोरुन नेला. बँकेला या बाबत कळताच ८ सप्टेंबर २०२० रोजी वरोरा पोलीस स्टेशन मध्ये रितसर तक्रार दाखल करण्यात आली. या संदर्भात वरोरा पोलीसांनी कारवाईला सुरुवात करण्याआधीच चोरांनी याच ठिकाणाहून मिक्सर चूरी (डस्ट) मशीन, त्याचे संपूर्ण पार्ट कापून घेऊन गेल्याचे कळते. या बाबतची माहिती वरोरा पोलिसांना देण्यात आली आहे. वरोरा पोलिस स्टेशन मध्ये चोरीची तक्रार दाखल केल्यानंतरही त्याच ठिकाणी पुन्हा चोरीची घटना घडते. दोन दिवसात एकाच ठिकाणाहून दोनदा चोरी ची घटना वरोरा पोलिसांना मोठे आव्हान आहे. हे भंगार चोरांचे काम आहे की तालुक्यात चोरट्यांची टोळी सक्रिय झाली? याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत आहे. बँकेच्या ताब्यात असलेल्या मालमत्तेचे असे नुकसान बँकेसाठी नुकसानीचे ठरत असले तरी, हे प्रकरण वरोरा पोलिसांसाठी ही आव्हान ठरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.