वैभव वैद्य - शहर प्रतिनिधी
राजुरा -
दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षक दिनानिमित्त 5 सप्टेंबरला शिक्षकांना त्यांचा शैक्षणिक, सामाजिक व राष्ट्रीय कार्यामध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात येतो.
प्रत्येक जिल्हा परिषद शिक्षक दिनानिमित्त आपल्या जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा मोठ्या थाटात आणि उत्साहात गुणगौरव करून सन्मान करीत असते. यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ह्या पुरस्कार सोहळ्याला थोडा विलंब होत असला तरी 9 सप्टेंबरला जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे नाव जाहीर करण्यात आले.
प्रत्येक तालुक्यातून एक प्राथमिक शिक्षकाचे नाव या पुरस्कारासाठी जाहीर करण्यात आले. यातील एक पुरस्कार हा माध्यमिक गटासाठी असतो व तो संपूर्ण जिल्हा परिषद हायस्कूल मधून एक असतो. या पुरस्काराचे मानकरी जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव पंचायत समिती कोरपना चे सहाय्यक शिक्षक स्वतंत्रकुमार कृष्णदत्त शुक्ला हे ठरले आहे.
स्वतंत्रकुमार शुक्ला हे 2009 पासून जिल्हा परिषद हायस्कूल विहीरगाव पंचायत समिती राजुरा येथे कार्यरत होते, सण 2018 मध्ये यांची प्रशासकीय बदली जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे करण्यात आली. या दोन्ही शाळांमध्ये त्यांनी उत्कृष्ट सामाजिक, शैक्षणिक व राष्ट्रीय कार्य केले व शाळेच्या प्रगतीमध्ये मोलाची भूमिका निभावली त्यामुळे जिल्हा परिषदेने त्यांचा गौरव जिल्हा शिक्षक आदर्श पुरस्कार जाहीर करून केलेला आहे.
टीम आमचा विदर्भ तर्फे पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन..!
(या ठिकाणी अल्प दरात जाहिराती करिता संपर्क करा.)


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.