परन्तु स्वच्छता कुठेही दिसत नाही, सांडपाण्याच्या नाली सफाई करून त्या वरती कीटक नाशक फवारणी करावी जनेकरून डेंगू, चिकन गुणीया या आजारांनी डोके वरती काठू नये या करिता आरोग्य विभागणी खबरदारी घेणे नगर पंचायतची जवाबदारी नाही, फक्त माक्स लावून नसल्याना दंड ठोकायचा फक्त एवेळीच जवाबदारी नगर पंचायतची आहे का ? असा प्रश्न नागरिक विचारत आहे.
सध्याच्या परीस्थितीत स्वच्छते कडे लक्ष देणे गरजेचे आहे, परन्तु अनेकदा तक्रारी देऊन सुद्धा नगर पंचायतला काही देणे घेणे नाही, कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे व शहरात सुद्धा कोरोनाचा शिरकाव झाला आहे, या खबरदारी म्हणून नगर पंचायतच्या आरोग्य विभागानी, शहरातील स्वच्छता, जंतनाशक फवारणी व डेंगू मलेरिया, चिकन गुणिया या वरती कोणती काळजी घेतली पाहिजे त्या संदर्भात जनजागृती करणे गरजेचे होते. परन्तु आरोग्य विभागाच्या माध्यमातून कोणतीच खबरदारी घेत नसल्याने आरोग्य विभागच बिमार तर नाही ना असा सवाल कोरपना येथील नागरिक करीत आहे.


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.