Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चंद्रपूर जिल्ह्यात 25 सप्टेंबर पासून 7 दिवसांसाठी जनता कर्फ्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांनी केला जनता कर्फ्यू ला विरोध मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात कोरोन...

  • आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांनी केला जनता कर्फ्यू ला विरोध
मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर असा ७ दिवसाचा जनता कर्फ्यू लावण्याच्या निर्णय आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन इमारतीत आयोजित बैठकीत घेण्यात आला आहे. यापूर्वी चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, भद्रावती, गडचांदूर मध्ये जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. जनता कर्फ्यू  लावण्यामागचा मुख्य उद्देश कोरोना साखळी खंडित करणे हा त्याचा मुख्य हेतू होता. परंतु जनता कर्फ्यू दरम्यान ११९६ कोरोना बाधित आढळले. कर्फ्यू दरम्यान, एकाच दिवसात सर्वाधीक ४०१ कोरोना बाधितांची सुद्धा नोंद झाली होती. आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार, महापौर राखी कंचर्लावार यांच्यासमवेत जिल्हा कार्यालयात सर्वपक्षीय प्रतिनिधी, व्यापार मंडळाचे प्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर असा ७ दिवसाचा जनता कर्फ्यू लावण्याच्या निर्णय घेण्यात आला. आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांनी जनता कर्फ्यू चा विरोध केला असून उर्वरित सर्वपक्षीय प्रतिनिधींनी जनता कर्फ्यू ला पाठिंबा दर्शविला, २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर असा ७ दिवसाचा जनता कर्फ्यू लावण्याच्या निर्णय घेण्यात आला. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top