Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: JCI राजुरा रॉयल्स द्वारा जेसी सप्ताह उत्साहात साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वैभव वैद्य - शहर प्रतिनिधी  राजुरा - जेसीआय इंडिया द्वारा संपूर्ण भारतात 9 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर पर्यन्त जेसी सप्ताह 2020 चे आयोजन करण्यात...


वैभव वैद्य - शहर प्रतिनिधी 
राजुरा -
जेसीआय इंडिया द्वारा संपूर्ण भारतात 9 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर पर्यन्त जेसी सप्ताह 2020 चे आयोजन करण्यात आले. समाज कार्यात अग्रसर राहणाऱ्या JCI राजुरा रॉयल ने सुद्धाजेसी सप्ताह उत्साहात आणि थाटात साजरा केला. 

कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता एसटी कर्मचाऱ्याना आणि प्रवास्यांना 9 सप्टेंबर पहिल्या दिवशी बस स्टॅन्ड राजुरा येथे 'मास्क वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

दुसऱ्या दिवशी 10 सप्टेंबर रोजी 'सेव्ह वॉटर फॉर अनादर जनरेशन' या थीम अंतर्गत 'सेव्ह वॉटर - सेव्ह लाईफ' चे स्टिकर बस स्टॅन्ड, पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफिस, तहसील ऑफिस, हॉटेल, मंदिर, सुपर मार्केट, मंगल कार्यालय, पेट्रोल पंप, स्कुल,कॉलेज तसेच विविध पाण्याचे स्रोत असणाऱ्या ठिकाणी 'सेव्ह वॉटर - सेव्ह लाईफ' चे स्टिकर लावण्यात आले तसेच कोरोना योद्धा डॉक्टर्स आणि नर्स यांना पीपीई किट चे वितरण करण्यात आले.

दिनांक 11सप्टेंबर रोजी फिटनेस फ्रायडे अंतर्गत जुन्या काळातील विविध मैदानी खेळ मुलांसोबत खेळण्यात आले, यात उंच उडी, लगोरी, कंचे, रस्सी खेच इत्यादी खेळ आयोजित करण्यात आले.तसेच आजच्या काळात आरोग्य सुदृढ राहण्यासाठी योग किती आवश्यक आहे याचे महत्व पटवून देण्यात आले तसेच आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी फिट इंडिया मोहिमे अंतर्गत शपथ घेण्यात आले.

दिनांक 12 सप्टेंबर चौथ्या दिवशी रक्तदान तसेच प्लाझ्मा दान किती गरजेचे आहे ही जागरूकता निर्माण करण्यासाठी ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

दिनांक 13 सप्टेंबर पाचव्या दिवशी 'सेव्ह अर्थ नाऊ ऑर नेव्हर' या थीम अंतर्गत वृक्ष वितरण तसेच वृक्ष लागवड हा कार्यक्रम जिल्हा परिषद हायस्कुल विहिरगाव येथे घेण्यात आला. जेसी सदस्या द्वारे आप आपल्या परिसरात आयुर्वेदिक गार्डन निर्माण करण्यात आले. तसेच पर्यावरण संरक्षण करण्यासाठी सोषल मीडिया वर विडिओ अपलोड करण्यात आले.

दिनांक 14 सप्टेंबर सहाव्या दिवशी 'वाव वेल्थ आउट ऑफ वेस्ट' या थीम अंतर्गत कापडी पिशवीचे वितरण, पेपर बॅग चे वितरण करण्यात आले. प्लास्टिक बॉटल चा वाढता वापर बघून या प्लास्टिक बॉटल चा पुनर वापर करून प्लांट प्लांटर बनविले तसेच पक्षयसाठी बर्ड फिडर बनवून झाडांवर लाविण्यात आले. तसेच 'नो प्लास्टिक वर्ल्ड ' या विषयावर ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

दिनांक 15 सप्टेंबर सातव्या दिवशी जेसिआई इंडिया द्वारा 'ऍक्टिव्ह सिटीझन फ्रेमवर्क' या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच कोरोना योधाचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता जेसीआई राजुरा रॉयल्स च्या अध्यक्षा जेसी सुषमा शुक्ला, सचिव सुनंदा तुंबडे, ज्योती देऊरकर, डॉक्टर क्षमा बोढे, जयश्री शेंडे, सुशीला पोरेड्डीवार, रेखा बोढे, राखी यामसनिवार, शेर्ली हाडके, स्मृती व्यवहारे, मधुस्मिता पाढी, मीना महतो, प्रफुल्ला धोपटे, शारदा भगत, मनीषा पुन, अश्लेषा चव्हाण, तनु वासे, स्वतंत्र कुमार शुक्ला इत्यादींनी सहकार्य केले.










About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top