श्रावण कुमार - प्रतिनिधी
चंद्रपूर -
जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभरा, गहू, लाखोळी, रब्बी ज्वारी ही मुख्य पिके असून काही प्रमाणात जवस, मूग, उडीद ही पिके घेतली जातात. या पिकाच्या उत्पादनाची ग्राहकांकडून मागणी असल्याने व या मधून उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांनी या पिकांची रब्बी हंगामात लागवड करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
जिल्ह्यात मागील वर्षी रब्बी हंगामात 93 हजार 77 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली होती. यावर्षी रब्बी हंगामात 1 लक्ष 1 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आलेले आहे.
जिल्ह्यात रब्बी हंगामात जवस, करडई, मोहरी, रब्बी तीळ या पिकाचे क्षेत्र जरी कमी असले तरी या पिकाचा लागवडी खर्च कमी व उत्पादनातून चांगला भाव मिळत असतो. जवस, करडई, मोहरी, रब्बी तीळ या पिकाच्या लागवडीसाठी तांत्रिक मार्गदर्शन कृषी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांचे मार्फत करण्यात येईल.


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.