Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ऑनलाइन रोजगार मेळाव्यात 131 उमेदवारांचा सहभाग
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
श्रावण कुमार - प्रतिनिधी चंद्रपूर - जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर या कार्यालयाचा माध्यमातून 25 सप्टेंबर...

श्रावण कुमार - प्रतिनिधी
चंद्रपूर -

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर या कार्यालयाचा माध्यमातून 25 सप्टेंबर रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. एकूण 131 उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यामध्ये नोंदणी केली, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी दिली आहे.

ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड नाशिक प्लांट, पीएनबी मेटलाईफ इंडिया इंशुरन्स कंपनी लिमिटेड नागपूर, पवनसुत मशिनरी अँड इलेक्ट्रिकल चंद्रपूर या कंपन्यामध्ये अनुक्रमे ट्रेनी, फायनाशियल ऍडव्हायझर, इलेक्ट्रिशियन, या पदासाठी  या तीन कंपन्यांनी  सहभाग  घेतला.

या कंपन्यांमध्ये इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर स्वतःचे  नांव  नोंदणी करुन किंवा ज्यांनी यापूर्वी नावनोंदणी केलेली असेल अशा सर्व बेरोजगार उमेदवारांनी आपल्या युजर आयडी व पासवर्डने लॉगीन करुन दिनांक 25 सप्टेंबर, 2020 रोजी वेबपोर्टलवर रोजगार मेळाव्यासाठी नोंद केलेल्या उद्योजकांच्या रिक्त पदांकरीता उद्योजकांनी नमुद केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोंदणी केली.        


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top