- सासरा व साळ्याने केली जावईची हत्या
- एका आठवड्यात माजरीत दुसरी हत्या
माजरी -
माजरी च्या एकतानगर मध्ये सासऱ्याने व साळ्याने मिळून जावई च्या डोक्यावर कुऱ्हाडीने व लोखंडी रॉडने वार करून हत्या केल्याची घटना रविवारी सांयकाळी साडेसातच्या सुमारास भद्रावती तालुक्यातील माजरी येथे घडली. आरोपी सासऱ्यास व साळ्या यांनी मारल्यावर स्वता पोलिसांत स्वताला आत्मसमर्पण केले. गेल्या आठ दिवस पूर्वी माजरीत अतिक्रमण जागे साठी वाद होऊन एका युवकाची धार धार शास्त्रनी वार करून हत्या झाली होती. आता पुन्हा या घटनेने माजरीत खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार संदीप हरिदास साबळे वय ३० रा.एकता नगर शिवमंदिर रोड माजरी कॉलरी याने काही वर्षापूर्वी येथीलच रहिवाशी अमृतलाल केवट यांची लहान मूलगी ज्योती हिचे सोबत प्रेमविवाह केला होता. दरम्यान संदीपला एक मुलगा व एक मूलगी असून एक वर्षापूर्वी त्याच्या मुलगा ज्योती माहेरीअसताना नाल्यात बुडून मरण पावला होता. तेव्हा पासून त्यांचे आपसात झगड़े सुरु झाले. संदीप हा पत्नीला मारहाण करत असल्याने तेव्हापासून ज्योती आपल्या मुलीला घेवून माहेरी राहत होती. संदीप हा नेहमी दारू पिवून सासरवाडीत जावून पत्नी व सासऱ्या सोबत झगड़ा-भांडण नेहमी करत असायचे. दरम्यान एक महिन्यापूर्वी पती-पत्नी मध्ये भांडण झाले होते. दरम्यान रविवारी रोजी सांयकाळी साडेसातच्या दरम्यान संदीपची पत्नी ही रेल्वे कॉलोनीत घरगुती मोलकरीण काम करत असते ती काम करून परत येताना संदीप साबळेने तिचा हाथ पकडून घरी चाल असे म्हणून तिचेसोबत झटापटी करीत असताना त्याचा साळा विजय अमरितलाल केवट हा मध्यस्थी करून बाहिणीचा हाथ सोडविला.त्यावरून संदीपने त्याचे डोक्यावर काचेची बाटली मारली. त्या कारणावरुन त्याचा सासरा अमृतलाल याने लोखंडी रॉड व साळा विजय केवट याने लोखंडी कुऱ्हाडने संदीप साबळे याचे डोक्यावर मारून गंभीर जखमी केले.दरम्यान एकता नगरच्या रोडच्या गल्लीतुन जोरदार कल्ला ऐकू आल्याने संदीपचे काका मोक्यावर धावून गेले असता त्या गल्लीत संदीप हा रक्तभंभाळून अवस्थेत जमीनीवर पडलेला दिसला व डोक्यातुन रक्त निघत होते. सासरा अमृतलाल केवट ४८ व विजय केवट १९ यांनी लोखंडी रोड व कुऱ्हाड ने हमला करून करून निघून घेणे होते. संदीपचे साबळे चा काका चरण साबळे यानी आजूबाजूच्या लोकांना आवाज दिले व लोकांच्या मदतीने संदीपला उचलून वेकोलिच्या एरिया हॉस्पिटल येथे भर्ती केले. दरम्यान संदीपची प्रकृति गंभीर असल्याने पुढील उपचाराकरिता सरकारी दवाखाना चंद्रपुर येथे रेफर करण्यात आले.मात्र उपचारादरम्यान संदीप साबळे याचा मृत्यु झाला. माजरी पोलिसांनी आरोपी अमृतलाल केवट ४८ व विजय केवट १९ यांच्या विरुद्ध हत्याचा गुन्हा दाखल केला आहे. वरोरा चे उपविभागीय पोलिसअधिकारी निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली माजरीचे ठाणेदार सदाशिव ढाकणे हे तपास करत आहे. बाप लेकाला आज भद्रावती च्या न्यायालयात हजर केले असता आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे.


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.