Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू तर एक जखमी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ब्रम्हपुरी तालुक्यात एका महिन्यातील दुसरी घटना सासऱ्याच्या समोर जावयाचा दुःखद मृत्यू मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी ब्रम्हपुरी - शेतात काम कर...

  • ब्रम्हपुरी तालुक्यात एका महिन्यातील दुसरी घटना
  • सासऱ्याच्या समोर जावयाचा दुःखद मृत्यू
मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी
ब्रम्हपुरी -
शेतात काम करीत असतांना अचानकपणे वीज पडून एक जण जागीच ठार झाला तर एक जण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील गोगाव शेतशिवारात आज सायंकाळी ६ च्या सुमारास घडली आहे. मृतकाचे नाव अरविंद तिजारे वय ४० रा. तळोधी खुर्द असे असुन जखमीचे नाव नंदु बडगे वय ३५ रा. गोगाव असे आहे.

सविस्तर माहीतीनुसार मृतक नंदू बडगे हा अल्पभुधारक शेतकरी असल्याने त्याने गोगाव शेतशिवारात भाडेतत्वावर शेती केली होती. तिथेच तो आपल्या शेतीवर काम करण्यासाठी गेला होता. सोबत त्याच्या बहिणीचा पती सुध्दा होता. तेव्हा आज सायंकाळी ६ च्या सुमारास मेघ गर्जनेसह पावसाला सुरवात झाली. आणि अचानकपणे वीज मृतक अरविंद च्या अंगावर पडली. त्यामुळे तो जागीच ठार झाला. तर त्याच्या सोबत असलेला नंदू बडगे हा जखमी झाला.

मृतकाच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा आप्त परीवार आहे. ब्रम्हपुरी तालुक्यात या महिन्यात वीज पडुन मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना असुन काही दिवसांपूर्वी पारडगाव येथील पतीपत्नी च्या धावत्या दुचाकीवर वीज पडून दोघांचाही मृत्यू झाला होता. 


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top