Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मुस्लिम समाजाला आरक्षण द्या - रा.काँ. ची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी राजुरा - महाराष्ट्रात मुस्लिम समाजाची राजकीय, सामाजिक, आर्थिक, आण...

  • मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी
राजुरा -
महाराष्ट्रात मुस्लिम समाजाची राजकीय, सामाजिक, आर्थिक, आणि शैक्षणिक स्थिती अतिमागास झालेली आहे. त्यावर आधारित शिक्षण आणि नौकरी मध्ये १० टक्के आरक्षण द्या या मागणीचे निवेदन राजुरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदारां साहेबानं मार्फत देण्यात आले.

महाराष्ट्रात मुस्लिम समाज सर्व स्तरावर अतिशय मागास झाला आहे, सच्चर समिती मोहम्मदूर रहमान समिती, आणि रंगनाथ मिश्रा आयोग यांनी सखोल अभ्यास, चौकशी करून आपल्या अहवालात ही बाब सादर केलेली आहे व दहा टक्के आरक्षण मिळावे म्हणून स्पष्ट शिफारस देखील केलेली आहे. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची कायदेशीर बाजू संविधानानुसार भक्कम आहे. मुस्लिम समाजा शैक्षणिक सामाजिक आर्थिक अति मागासलेपणावर आधारित आहे. जी संविधानिक आहे. या मागणीत कुठेही धमार्ची अडचण येत नाही. 

यावेळी रा.काँ. चे शहर अध्यक्ष आशिष यमनुरवार, उपाध्यक्ष राजु ददगाळ, महासचिव नदीम महेमुद शेख, महासचिव अंकुश भोंगळे, संघटक सचिव संदीप पोगला, संघटक सचिव जुनेद शेख, ईमरान पटेल, वसिम शेख, सैय्यद शाहिद, अरबाज पठाण, सोहेल शेख, वसिम शेख व नावेश शेख उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top