- बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याची राजुरा शहर युवक काँग्रेसची मागणी
- शहर युवक काँग्रेसने मागणीचे निवेदन तहसीलदार साहेबांना दिले
केंद्रातील मोदी सरकार युवकांसाठी वर्षाला दोन कोटी रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आले. पण परिस्थिती मात्र वेगळीच आहे. नोटबंदीमुळे भारतात सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणाऱ्या कृषी व सूक्ष्म लघु, मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा फटा बसला. त्याची परिणीती म्हणजे करोडो रोजगार नष्ट झाले. वस्तू सेवा कराच्या कुटीर व लघु मध्यम क्षेत्राचे आणि उद्योग धंद्याचे पार कंबरडे मोडले असून याचा परिणाम म्हणजे बेरोजगारी मोठ्ठ्या प्रमाणात वाढण्यात झाला. पंतप्रधान मोदी यांच्या २० लाख करोडाच्या पैकेज मधून बेरोजगार युवक, शेतकरी व लघु, मध्यम उद्योग क्षेत्र यापैकी कोणत्याही घटकास मदत झाली नाही. मोदी सरकार रोजगार दो अशी मागणी युवक काँग्रेस चे शहर अध्यक्ष अशोक राव यांनी केली आहे.
मोदींनी दरवर्षी २ कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासनाला जाणून रोजगार निर्मितीवर लक्ष दिले पाहिजे. युवक हे निराश झाले आहेत, आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. केंद्र सरकारने रोजगार निर्मितीची स्वतःची जबाबदारी ढकलून चालणार नाही. तरुण हाताना काम हवे आहे. मोदी सरकारकडे आमची मागणी एकच आहे, रोजगार दो! या बाबतचे निवेदन तहसीलदार साहेबांना राजुरा युवक काँग्रेस कमिटी द्वारा देण्यात आले.
काँग्रेस चे शहर अध्यक्ष अशोक राव, ग्राम पंचायत सदस्य जगदीश बुटले, सोनिया नगर वॉर्ड अध्यक्ष निरंजल मंडल, सय्यद शाहिद आदींनी निवेदन दिले.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.