Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता संचारबंदीत सहभागी व्हावे : ना. वडेट्टीवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपूर, दुर्गापूर, पडोली, उर्जानगर व बल्लारपूर शहरात रविवार पर्यंत जनता संचारबंदी जाणून घेऊया..! काय सुरू, काय बंद श्रावण कुमार - प्रतिनिध...

  • चंद्रपूर, दुर्गापूर, पडोली, उर्जानगर व बल्लारपूर शहरात रविवार पर्यंत जनता संचारबंदी
  • जाणून घेऊया..! काय सुरू, काय बंद
श्रावण कुमार - प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपूर शहर तसेच लगत असणारे दुर्गापूर, पडोली, उर्जानगर व बल्लारपूर शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. कोरोनाचा प्रसार आणखी वाढु नये, संसर्गाची साखळी खंडित व्हावी यासाठी  लोकप्रतिनिधी तसेच व्यापारी असोसिएशनच्या संमतीने 10 सप्टेंबर गुरुवार ते 13 सप्टेंबर रविवार पर्यंत जनता संचारबंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. नागरिकांनी या जनता संचारबंदीचे पालन करून स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

या बाबी सुरू राहतील -
सर्व रुग्णालय, औषधालय, कृषी केंद्र, शासकीय कार्यालय, तसेच एमआयडिसी मधील सर्व आस्थापना सुरु राहतील. दूध वितरण, पार्सल सुविधा, सर्व पेट्रोल पंप, वर्तमानपत्रांचे वितरण सुरू राहतील.

या बाबी बंद राहतील -
सर्व किराणा, भाजी-फळे दुकाने, बाजारपेठेतील इतर दुकाने पूर्णता बंद राहतील. बँका फक्त अंतर्गत कामकाजासाठी सुरू असतील परंतु ग्राहक सेवेसाठी बंद राहतील. त्याचबरोबर, चंद्रपूर शहर, दुर्गापूर, पडोली, उर्जानगर व बल्लारपूर शहरातील सर्व पानठेले, चहा टपऱ्या, हातगाड्या, फुटपाथवरील सर्व दुकाने बंद राहतील.

(या ठिकाणी अल्प दरात जाहिराती करिता संपर्क करा.)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top