Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चिमूर विधानसभेत भ्रष्टाचाराचा सुळसुळाट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रेती व दारू तस्करी च्या मुद्द्यावर आम आदमी पार्टी ची गांधी जयंती ला उपोषणाची तयारी CID चौकशीची मागणी प्रा.डॉ. अजय घनश्याम पिसे यांच्या नेतृत...

  • रेती व दारू तस्करी च्या मुद्द्यावर आम आदमी पार्टी ची गांधी जयंती ला उपोषणाची तयारी
  • CID चौकशीची मागणी
  • प्रा.डॉ. अजय घनश्याम पिसे यांच्या नेतृत्वात आप चे पदाधिकारी व स्वयंसेवक करणार उपोषण
  • तस्करी होत असलेल्या रेतीघाटावरच उपोषण करणार
मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी
चिमूर -

मागील काही महिन्यांपासून चिमूर विधानसभेत भ्रष्टाचाराचा सुळसुळाट चाललेला आहे. उघळपणे होत असलेल्या रेती व दारू तस्करी मुळे जनतेचा प्रशासनावर विश्वास उरलेला नसून या भ्रष्टाचाराला राजकीय आशीर्वाद असल्याचे सगळीकडे बोलल्या जात आहे. ऐतिहासिक वारसा असलेला चिमूर विधानसभा क्षेत्र आता भ्रष्टाचाराचे ‘माहेरघर’ म्हणून ओळखल्या जात आहे.   

कोरोना काळात संचार बंदीचा पुरेपूर फायदा घेत अनेक रेती तस्कर सक्रीय झालेले आहेत. उघळपणे होत असलेल्या रेती तस्करी मुळे व काही राजकीय पक्षाचे लोकच यामध्ये पकडल्या गेल्यामुळे जनतेच्या मनात अनेक प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. 

राजरोसपणे होत असलेल्या रेती व दारू तस्करीत राजकीय आशीर्वाद असल्याचे बोलल्या जात आहे. काही दिवसाआधी चिमूर विधानसभेत सागवान तस्करी चा प्रकार आढळून आला होता. या सर्व प्रकारात शासनाचे लक्ष वेधावे तसेच सी.आय.डी. चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वात चिमूर विधानसभेतील आम आदमी पार्टी चे सर्व पदाधिकारी व स्वयंसेवक येत्या २ ऑक्टोबर ला गांधी जयंती चे औचित्य साधून तस्करी होत असलेल्या रेतीघाटावर एक दिवसीय लक्षणिक उपोषणाला बसणार आहेत. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी व पोलीस उपनिरीक्षक चिमूर यांना निवेदन देण्यात आले, या दरम्यान आप चे चंद्रपूर जिल्हा संघटक परमजित सिंग,आदित्य पिसे, मंगेश शेंडे, सुशांत इंदोरकर, विशाल इंदोरकर,विशाल बारस्कर, कैलाश भोयर व अनेक पदाधिकारी उपस्थित होते. 


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top