मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर -
माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर परिसरात 9.22 लक्ष रु किमतीच्या विकासकामांना मान्यता देण्यात आली आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दुर्गापूर परिसरातील नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे .
दुर्गापूर वॉर्ड नं 2 येथे जि. प. मराठी प्राथमिक शाळेत मुत्रीघर व शौचालय बांधकामासाठी 3.22 लक्ष रु., दुर्गापूर वॉर्ड नं 3 येथे रविदास मंदिरासमोरील जागेत पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी 3 लक्ष रु. तसेच दुर्गापूर वॉर्ड नं 2 येथे अंगणवाडी समोरील जागेत पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी 3 लक्ष रु. या प्रमाणे एकूण 9.22 लक्ष रु निधी आमदार निधीतून मंजूर करण्यात आला आहे. या परिसरातील नागरिकांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सदर विकासकामांसाठी मागणी केली होती. आ. मुनगंटीवार यांनी त्वरित सदर विकासकामांना मंजुरी देण्यात येईल असा शब्द नागरिकांना दिला होता. सदर विकासकामांना लवकरच सुरुवात होणार आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल भाजपा नेते रामपाल सिंह, भाजप तालुकाध्यक्ष हनुमान काकडे, जिल्हा परिषद सदस्य रोशनी खान, पंचायत समिती सभापती केमा रायपूरे, पंचायत समिती सदस्य संजय यादव, देवानंद थोरात, घनश्याम यादव आदींनी अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.