- शेतकरी आर्थिक संकटात
- अतिपावसाने कपाशीबरोबर सोयाबीनलाही फुटतोय अंकुर
शेतकरी नेहमीच अस्मानी व सुलतानी संकटाला तोंड देत असतात. यंदा मार्च महिन्यापासूनच कोरोनाचा प्रकोप असल्याने कोरोना काळात मशागतीसह पेरणीचे मोठे आव्हान उभे ठाकले होते, त्यातूनही मार्गक्रमण करून शेतकऱ्यांनी बँकेतर्फे कर्ज काढून कपाशी, तूर व सोयाबीेनची लागवड करून शेतशिवार फुलविले.
सततच्या पावसाने बिबी, नांदा, पिंपळगाव, लखमापुरसह अन्य परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस सोयाबीन व तूर या उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला, यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचे मत परिसरातील शेतकरी करीत आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगातील दाण्यांना अंकुर फुलले, बोगस बियानांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आणि आता मात्र सोयाबीनच्या कापणीकरिता प्रती बॅग २३००-२५०० रु. मोजावे लागत आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला.सोयाबीनचे हातचे पीक गेल्यावर कपाशी उत्पन्नावर शेतकऱ्यांची भिस्त होती, मात्र सततचा पाऊस व ढगाळी वातावरणाचा विपरीत परिणाम झाल्याने कपाशीवर बुरशीजन्य रोगाचा व अळीचा प्रादुर्भाव वाढत असून कपाशीची खालच्या भागातील काही बोंडे सडून काळवंडू लागली आहे,जे बोंडे परिपक्व होऊन टिचकू लागले त्या बोंडातील सरकींना कोंबे फुटलीत त्यामुळे अंकुरलेल्या बोंडाचा कापूस वेचने शक्य नाही, यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी २-३ क्विंटल कापसाचे नुकसान झाले आहे. ढगाळी वातावरणामुळे तुरीवर भिस्त असून तुरीदेखील हातून जाण्याची शक्यता बळावली जात आहे. आर्थिक विवंचनेत गुरफटलेला शेतकरी हवालदिल होऊन संकटाच्या कोंडीत सापडला असून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.
ज्या शेतकऱ्यांनी मे अखेरच्या व जून महिन्याच्या पहिल्या आठवढ्यात कपाशीची लागवड केली, त्या कपाशीची बोंडे परिपक्व होऊन टिचकू लागली. मात्र सततच्या पावसाने परिपक्व झालेली बोंडे काळवंडू लागलीत, यामुळे एकरी दोन-तीन क्विंटल कापसाचे नुकसान झाले असून यंदा शितदहीला विलंब होणार आहे.नामदेव आडखिनेशेतकरी बिबी


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.