- व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला कोरोना विषयक आढावा
यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, मनपा आयुक्त राजेश मोहिते, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, तहसीलदार निलेश गौंड, अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दिपेन्द्र लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत उपस्थित होते.
दैनंदिन 50 कुटुंबातील व्यक्तींची तपासणी करून कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास त्यांना उपचार द्यावेत. कोरोनाची लक्षणे ही एका दिवसात दिसत नसून काही व्यक्तींमध्ये दोन ते चार दिवसात दिसू लागतात. त्यामुळे दैनंदिन दूरध्वनीद्वारे त्या व्यक्तीच्या लक्षणांची माहिती जाणून घ्यावी. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने राज्यभर 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहिम राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील शहर, गावे, वस्त्या यातील प्रत्येक नागरीकाची आरोग्य तपासणी आणि प्रत्येक नागरिकास आरोग्य शिक्षण द्यावयाचे आहे, असे श्री. कुमार म्हणाले.
संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी यांनी एकमेकात समन्वय ठेवून व या कार्यात पुढाकार घेऊन आरोग्य तपासणी व सर्वेक्षण करणाऱ्या चमूला विशिष्ट घरे ठरवून द्यावी. एखादी व्यक्ती संशयित आढळल्यास त्याला तात्काळ उपचार द्यावेत. तालुकास्तरावर काही अडचण भासल्यास जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांना कळवावे. तसेच या मोहिमेत ग्रामस्तरावर तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, यांना मोहीम यशस्वी करण्यासाठी कार्य करण्याच्या सूचना द्याव्यात. ग्रामीण भागात होर्डींग, फ्लेक्स, पत्रके या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी.अशा सूचना श्री. कुमार यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्यात.
त्यासोबतच सर्व तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडून ग्रामीण भागातील वाढती रुग्ण संख्या, दैनंदिन सुरू असलेले सर्वेक्षण याबाबत विस्तृत माहिती जाणून घेतली.


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.