Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वीज स्वस्त न केल्यास पोलिसांत तक्रार!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
करोना काळातील २०० युनिटपर्यंत बिल माफ आणि ३०० युनिटपर्यंत ३० टक्के वीज १ ऑक्टोबरपर्यंत स्वस्त न केल्यास सर्व पोलिस ठाण्यांत तक्रार करण्यात य...

करोना काळातील २०० युनिटपर्यंत बिल माफ आणि ३०० युनिटपर्यंत ३० टक्के वीज १ ऑक्टोबरपर्यंत स्वस्त न केल्यास सर्व पोलिस ठाण्यांत तक्रार करण्यात येईल, असा इशारा आम आदमी पक्षाने थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिला आहे. वाचा सविस्तर....
आयशा - प्रतिनिधी
नागपूर -
करोना काळातील २०० युनिटपर्यंत बिल माफ आणि ३०० युनिटपर्यंत ३० टक्के वीज १ ऑक्टोबरपर्यंत स्वस्त न केल्यास सर्व पोलिस ठाण्यांत तक्रार करण्यात येईल, असा इशारा आम आदमी पक्षाने थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिला. जिल्हा संयोजक कविता सिंघल व शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघ संयोजकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेलद्वारे पत्र पाठवून वीजबिल माफ करण्याची मागणी केली.

करोनाकाळातील चार महिन्यांचे २०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करावे, वीजदरवाढ मागे घ्यावी, जाहीरनाम्यानुसार ३०० युनिटपर्यंत ३० टक्के सवलत द्यावी, १६ टक्के अधिभार व वहन कर रद्द करावा, वीजकंपन्यांचे कॅगद्वारे ऑडिट करावे, आदी मागण्यांचे पत्र अजय धर्मे, अजय पिसे, लक्ष्मीकांत दांडेकर, आकाश केवले, रोशन डोंगरे, प्रतीक बावनकर यांनी पाठवले. सरकारने विजेच्या प्रश्नावर वारंवार चर्चा केल्या. मात्र, जनतेच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. याबाबत १ ऑक्टोबरपर्यंत सर्व जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यांत फसवणुकीची तक्रार करण्यात येईल, असा इशारा 'आप'ने दिला आहे. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top