Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बल्लारपूर डीबी पथकाची धडक कार्यवाही
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
6 लाख 90 हजार रुपयांची विदेशी दारू जप्त एक आरोपी अटकेत, दुसऱ्याचा आरोपीचा शोध सुरु रमेश निषाद - प्रतिनिधी बल्लारपूर - बल्लारपूर डीबी गुन्हे ...

  • 6 लाख 90 हजार रुपयांची विदेशी दारू जप्त
  • एक आरोपी अटकेत, दुसऱ्याचा आरोपीचा शोध सुरु
रमेश निषाद - प्रतिनिधी
बल्लारपूर -

बल्लारपूर डीबी गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक तिवारी व त्यांच्या टीमने आज सापळा रचुन फुलसींग नाईक वार्ड, बल्लारपूर येथील एका घराची झडती घेतली असता घराच्या शेजारी असलेल्या गल्ली मध्ये अवैधरित्या लपवुन ठेवलेला दारु साठा आढळुन आला, त्यात 6 लाख 90 हजार रुपयांचा देशी व वीदेशी पेट्या आठळुन आल्या, दरम्यान आरोपी जगजीत सिंग अमरसिंग नागले 32 याला अटक करण्यात आली असुन दुसऱ्या आरोपीचा शोध सुरु पोलीस करीत आहे. 

सदर कारवाई पोलीस निरीक्षक शिवलाल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तिवारी, संतोष दंडेवार, सुधाकर वरघने, शरद कुडे, अजय हेडाऊ, शेखर माथनकर, स्वप्नील देरकर, सुनील कांबळे, सीमा पोरते यांनी केली. 


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top