चिमूर -
कोरोना संसर्गाचा आलेख वाढतच आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी घरोघरी भेटी देऊन आरोग्य तपासणी व जनजागृती केली जात आहे. संशयित करोना रुग्ण शोधणे, तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनी आजार असलेल्या व्यक्तींना शोधण्याचे काम मोहिमेत केल्या जाणार आहे. याशिवाय बालकांचे लसीकरण करणे. गरोदर मातांवर वेळीच उपचार या बाबींचाही समावेश आहे. या संदर्भात २९ सप्टें. मंगळवारी "माझे कुटुंब माझी जबाबदारी" सर्वेक्षण आढावा बैठक प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरपूर येथे आयोजित करण्यात आली. यात पंचायत समिती चिमूर चे गट विकास अधिकारी संजय पुरी, गट शिक्षणाधिकारी किशोर पिसे, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी आढावा घेतली. "माझे कुटुंब माझी जबाबदारी" सर्वेक्षण ताबडतोब सुरू करण्यासाठी निर्देश देण्यात आले. यावेळी मेडिकल ऑफिसर, केंद्रप्रमुख, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.