Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आशा वर्करला शिविगाळ - गावात तणावाचे वातावरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेला चेक बरांज वासीयांचा विरोध आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स भद्रावती - कोविड-19 चा प्रादुर्भाव रो...

  • 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेला चेक बरांज वासीयांचा विरोध
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
भद्रावती -
कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेला भद्रावती तालुक्यातील चेक बरांज या गावात विरोध करण्यात आला असून आशा वर्करला शिविगाळ करण्याची घटना 26 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. 

कोविड-19 चा मुकाबला करण्याकरीता शासन युद्धस्तरावर प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शासनाने 'माझे कुटुंब,माझी जबाबदारी' ही मोहीम शासनाने सुरु केली. चंद्रपूर जिल्ह्यात या मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते नुकताच झाला. भद्रावती तालुक्यात 26 सप्टेंबरपासून या मोहिमेला प्रारंभ झाला. या मोहिमेत आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि त्याच गावातील शिक्षक यांचे एक पथक असते. हे पथक प्रत्येक कुटुंबाकडे जाऊन कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे तापमान, ऑक्सिजन, सर्दी, खोकला यांची नोंद करते. 

दरम्यान 26 सप्टेंबर रोजी चेकबरांज गावात सदर मोहिमे अंतर्गत सर्व्हे करण्याकरीता गावातील दोन शिक्षिका आणि मदतीला ग्रा.पं. शिपाई यांचे पथक गेले असता दोन-तीन घरी चांगले सहकार्य मिळाले. त्यानंतर मात्र इतर घरी जाताना सर्व ग्रामस्थांच्या रोषाला या पथकाला सामोरे जावे लागले. अफवांवर असलेला विश्वास आणि गैरसमज यामुळे ग्रामस्थांनी या पथकाला कडाडून विरोध केला व सर्व्हे करु दिला नाही. याबाबत तहसीलदार महेश शितोळे आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डाॅ. मंगेश आरेवार यांना कळविण्यात आले. लगेच दोन्ही अधिकारी चेकबरांज येथे दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांना खुप समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतू ते अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी हतबल होऊन दोन्ही अधिकारी माघारी परतले. सर्व ग्रामस्थ एकत्र आल्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यामुळे बराच काळ तणावाचे वातावरण होते. गावातील आशा वर्कर यांच्यावर ग्रामस्थांचा जास्त रोष होता. गावात सर्व्हेसाठी पथक येणार हे आम्हास का सांगितले नाही ? असा त्यांचा सवाल होता. त्यामुळे आशा सेविकांना शिविगाळ करण्यात आली. 

दरम्यान, यासंदर्भात गटविकास अधिकारी डाॅ. आरेवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ग्रामस्थांमध्ये खुप गैरसमज पसरलेला आहे. त्यामुळे हा प्रकार घडला. त्यामुळे आम्ही या गावातील सर्व्हे थांबविलेला आहे. गावकऱ्यांमधील गैरसमज लवकरच दुर करु आणि लगेच सर्व्हे सुरु करण्यात येईल.




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top