Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ओबीसी संवर्गात मराठा समाजाला समाविष्ट करण्याला विरोध
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी मराठा समाजाला ओबीसी संवर्गात समाविष्ट करू नये अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी राजुरा -  नुकतीच सुप्रीम कोर्टा...

  • राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी
  • मराठा समाजाला ओबीसी संवर्गात समाविष्ट करू नये
अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी
राजुरा - 
नुकतीच सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असून अनेक मराठा संघटना मराठा समाजाचा समावेश ओबीसी संवर्गात करून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करत आहेत. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी संवर्गात समाविष्ट करू नये यांकरीता राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी, अधिकारी महासंघ राजुरा च्या वतीने तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वड्डेटीवार, इतर मागास बहुजन कल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांना पाठविण्यात आले.

महाराष्ट्रातील ओबीसी जागेचा बॅकलॉग अजुनपर्यंत महाराष्ट्र सरकारने पूर्ण केलेला नाही. तसेच 18 जून 1994 च्या परीपत्रकानुसार ओबीसीचे 19% असलेले आरक्षण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मिळालेले नाहीत. वेगवेगळ्या जिल्ह्यातील आरक्षणातील विसंगती दिसून येत आहे. ही विसंगती त्वरित दूर करण्यात यावी, सर्वांची जातीनीहाय जनगणना करावी आणि मराठा समाजाला ओबीसी संवर्गात समाविष्ट करण्यात येऊ नये अश्या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तालुका अध्यक्ष संतोष देरकर, कार्याध्यक्ष कपिल इद्दे, महासचिव बादल बेले, समन्वयक संदीप आदे, नितीन पीपरे, निखिल बोंडे, विनायक काळे, नागेश उरकुडे, सुधाकर रासेकर, पुंडलिक वाढई, प्रकाश ठावरी, नितीन जयपूरकर, छोटूलाल सोमलकर आदी निवेदन देते वेळी उपस्थित होते. 




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top