- लवकरच जारी होऊ शकतात Unlock 5.0 च्या गाइडलाइन्स
- अनलॉक 5 अंतर्गत 31 ऑक्टोबरपर्यंत नवीन नियम जाहीर केले जाण्याची शक्यता
ऑक्टोबरपासून भारतात अनेक सण उत्सवांना सुरूवात होत आहे. त्यामुळेच एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत असतानाच सरकार कोणत्या परवानग्या देते आणि कोणत्या गोष्टींवर निर्बंध कायम ठेवते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मागच्या महिन्यात गृह मंत्रालयाने आणखी काही सूट देण्याचे सांगितले होते. आता हळूहळू कंटेनमेंट झोनबाहेरील ठिकाणी सूट दिली जाणार आहे. आता, सणासुदीच्या दिवसात काही उद्योगांना तेजी येऊ शकते, त्यानुसार आणखी सूट दिली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान कोरोना काळात लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून सिनेमागृह हे बंद आहेत. यालाही 1 ऑक्टोबरपासून परवानगी केंद्र सरकार देणार असल्याचे वृत्त आहे. यापूर्वी 21 सप्टेंबरपासून सिनेमागृह उघडण्यास परवानगी दिली जाऊ शकते अशा चर्चा होत्या. मात्र यावर सरकारने माहिती दिलेली नव्हती. तसेच जलतरण तलाव, मनोरंजन पार्कला परवानगी दिली जाऊ शकते. त्यामुळे आता 1 ऑक्टोबरपासून सिनेमागृह सुरु करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.




टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.