Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरोनावर मात करून विजयराव बावणे सुखरुप घरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अनिल चांदेकर - प्रतिनिधी धानोरा - पिपरी - कोरपना तालुक्यातील काँग्रेसचे नेते सि.डि.सी. बँकेचे संचालक तथा कोरपण्याचे नेते विजयराव बावणे यांना...

अनिल चांदेकर - प्रतिनिधी
धानोरा - पिपरी -
कोरपना तालुक्यातील काँग्रेसचे नेते सि.डि.सी. बँकेचे संचालक तथा कोरपण्याचे नेते विजयराव बावणे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांचेवर चंद्रपुर येथे उपचार सुरु होता. चंद्रपुर मध्ये दवाखान्यात भर्ती असतांना विरोधकांनी त्यांच्या तब्बेती विषयी अनेक तर्क-वितर्क लावले होते, परंतु कोरोना सारख्या महारोगावर आज विजयराव बावणे यांनी मात देऊन स्वगृही परतले त्या मुळे कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आंनदाचे वातारण निर्माण झाले. 

विजयराव बावणे कोरपना येथे येणार असे समजताच गावातील व खेड्याडील कार्यकर्त्यांनी बस स्टॅन्ड येथे येऊन त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ पुष्पगुच्छ देऊन  दिर्घ आयुष्य लाभो प्रार्थना केली. यावेळी  जिप सदस्य पेचे, न.प. उपाध्यक्ष मनोहर चन्ने, सुनील बावणे, संभापाटील कोवे, रसुल पटेल, विजय तेलंग, उपसरपंच अनिल गोंडे, प्रशांत लोडे, निसार शेख, उमेश पालीवाल (जावई,) मंजुर अली, संजय जाधव पिपर्डा, शब्बीर भाई, सलीम पारेख, शकील भाई, गणेश बोडेकर, विनायक ठाकरे, झिबल गेडाम, पियुष कावळे, धिरज चन्ने, अनिल चांदेकर, रहेमान भाई, भारत गौरी आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. 




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top