Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यानी दिली राजुरा येथील ग्रामीण रुग्णालय कोविड सेंटर ला भेट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी राजुरा - आज आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष रोशन येवले यांच्या नेतृत्वात संघटन मंत्री परमजीत सिंघ झगडे, कोषाध्...

अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी
राजुरा -
आज आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष रोशन येवले यांच्या नेतृत्वात संघटन मंत्री परमजीत सिंघ झगडे, कोषाध्यक्ष भीवराज सोनी, जेष्ठ नेते मिलिंद गड्ड्म्वार यांच्या मार्गदर्शनाखाली भेट देऊन चौकशी करण्यात आली.100 खाटाचे रुग्णालय सुरु करण्यात यावे. कारण तालुक्यातील ग्रामीण भागात डेंगू, मलेरिया, चिकनगुणनिया, ताप याची साथ चालु आहे आणि आणि एवढे मोठे रुग्णालय बांधून यामध्ये डॉक्टर, वेंटीलेटर, रुग्णवाहिका नाही पालकमंत्री तर आठ दिवसात सुरु होणार असे म्हणाले होते. पण या गोष्टीला जवड पास 15 दिवस उलटून गेले पण अजून रुग्णालय सुरु झाले नाही. आजारी लोकांना यामुळे खुप मोठा आर्थिक फटका बसत आहे. आजारी लोकांची गैरसोय होऊ नये व रुग्णालय त्वरित सुरु करावे. यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांकडे मागणी करणार आहे. यावेळी शेतकरी आघाडीचे तालुका संयोजक स्वप्नील कोहपरे, सहसंयोजक संतोष तौगर, संयोजक पवन ताकसांडे, युवा आघाडीचे विजय कमेपलीवर, प्रकाश सातपुते, शशिकांत सातपुते उपस्थित होते. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top