चिमूर -
चिमूर तालुक्यातील कार्यालयात कार्यरत असलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचा आज ३० सप्टेंबर रोजी चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
२७ सप्टेंबर ला चिमूर येथे आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेल्या अँटीजेन चाचणीत सदर व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉजिटीव्ह आला होता. सदर इसमाला श्वास घेण्यात त्रास होता, ऑक्सिजन लेव्हल ९० वर आली होती. फुफ्फुसात न्यूमोनायटिस झाला होता. त्यामुळे त्यांना उपचारार्थ चंद्रपूर येथे शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले होते.
व्हेंटिलेटरवर ठेऊन त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज दुपारच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. चंद्रपूर येथेच त्यांचा अंतीम संस्कार करण्यात येईल, अशी माहिती त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी दिली.



टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.