Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोवीड -19 जनजागृती अभियान अंतर्गत नगर परिषदे द्वारे विविध ऑनलाईन स्पर्धा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी राजुरा - सध्या कोरोना विषाणूची लागण जगभरातील अनेकांना झाली आहे. त्याच्या शिरकाव देशासह राज्यात देखील झाला आहे...

अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी
राजुरा -
सध्या कोरोना विषाणूची लागण जगभरातील अनेकांना झाली आहे. त्याच्या शिरकाव देशासह राज्यात देखील झाला आहे. या विषाणूची लागण रोखण्यासाठी व ती कमी करण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अशा जागतिक महामारीला दूर करण्यासाठी सर्वसामान्य जनता तसेच विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे.

मुलांमधील कोरोनाची भीती घालवून प्रतिबंधात्मक उपाययोजना लक्ष दिले जावे म्हणून नगर परिषद राजुरा तर्फे शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे दिनांक 15/09/2020 ते 25/10/2020 पावेतो मोहीम राबवण्याची असल्यामुळे covid-19 नियंत्रणासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी यावर आधारित विद्यार्थी तथा इतर नागरिकांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

निबंध स्पर्धा विषय - covid-19 नियंत्रणासाठी
1) माझे कुटुंब माझी जबाबदारी 2)मी कोविड योद्धा बोलतोय 3) covid-19 मुढे बदलणारे जग

चित्रकला स्पर्धा :
1) कोरोना विषाणू पासून बचावासाठी उपाय योजना, 2) लॉकडाउन व पर्यावरण,3) कोरोनामुळे बदलती सामाजिक स्थिती

पत्रलेखन स्पर्धा :
1) नातेवाईक/ मित्र/ शेजारी यांना कोरोनाविषाणू शी लढण्याकरिता पत्र लिहिणे 2)कोविड विषाणूला पत्र 3) कोविडं विषाणू ग्रस्त मित्र /मैत्रिणीला पत्र

वरील प्रमाणे घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा शालेय गट वर्ग 1 ते 4, 5 ते 8,9 ते 12 व खुला प्रवर्ग नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेली आहे सदर स्पर्धा हि ऑनलाईन दिनांक 01/10/2020 ते 10/10/2020 पर्यंत घेण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक गटातील विजेत्यांना नगरपरिषद राजुरा तर्फे आकर्षक पुरस्कार शिल्ड व प्रमाणपत्र तसेच सर्व सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना कोविड दूत म्हणून प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे प्रत्येक स्पर्धकांनी आपले निबंध/ चित्र/ पत्र हे नगरपरिषद चे व्हाट्सअप नंबर 9657430517 या क्रमांकावर स्वतःचे नाव, वर्ग ,मोबाईल नंबर सहीत संपूर्ण पत्ता लिहून पाठवावे. सदर स्पर्धेचे परीक्षण अनुभवी परीक्षकांकडून करण्यात येणार आहे. तेव्हा कोरोना विषाणूचा पादुर्भाव रोखण्यासाठी व विद्यार्थी तथा इतर नागरिकांमध्ये कोरोना बाबतचीजनजागृती व्हावी. याकरिता  जास्तीत जास्त विद्यार्थी तथा इतर नागरिकांनी या ऑनलाईन स्पर्धेत सहभागी व्हावे. असे आवाहन नगराध्यक्ष अरुण रा. धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, मुख्याधिकारी विजय कुमार सरनाईक, आरोग्य सभापती वज्रमाला बतकमवार यांनी केले आहे. 








About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top