- तिरवंजा येथे 13 लाखाचा मुद्देमाल जप्त
भद्रावती -
भद्रावती तालुक्यातील तिरवंजा येथे कोंबडा बाजार चालू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी धाड टाकली त्यात 11 आरोपीसह 13 लाख तीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला. यात विजय गुलाब महाजन 42, सुदाम देवराव निमकर 35, अमित प्रभाकर हेमके 31, प्रतीक दीपक हजारे 25, दिनेश रामदास लांजेकर 47 राहणार-चंद्रपूर, प्रशांत अजय मंत्रीवार 21 राहणार-दुर्गापुर, संजय हनुमान सुमटकर 30 राहणार-कवठी, शंकर अशोक येरगुडे 25 राहणार-तिरवंजा, ज्ञानेश्वर रामदास वनसिंग 22, आनंदराव किशोर झाडे 40 राहणार-छोटानागपूर, राजेश गजानन वाढई 30 राहणार-ऊर्जानगर असे आरोपींची नावे असून हे सर्व तिरवंजा येथील वनराईत कोंबड्यांवर पैशाची बाजी लावून जुगार खेळत असतांना पोलिसांनी धाड टाकली यात रोख रक्कम, दुचाकी व चार चाकी वाहन असा एकूण 13 लाख तीस हजाराचा मुद्देमाला सह आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले ही कार्यवाही ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख अमोल तुळ्जेवार, केशव चीटगिरे, हेमराज प्रधान, शशांक पदामवार यांनी केली.




टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.